डिजिटल मीडियाच्या अधिवेशनात विविध विषयावर विधी तज्ञांचे मार्गदर्शन! Digital midia kayda ...
डिजिटल मीडियाच्या अधिवेशनात विविध विषयावर विधी तज्ञांचे मार्गदर्शन! Digital midia kayda


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर गडचिरोली जिल्हा व डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया ( भारत सरकार मान्यता प्राप्त स्वयंनियामक संस्था )यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूज पोर्टल संपादकांसाठी दोन दिवसीय अधिवेशन एल्गार प्रतिष्ठान चितेगाव तालुका मुल येथे आयोजित करण्यात आले होते. दिनांक 19 व 20 नोव्हेंबरला संपन्न झालेल्या अधिवेशनात कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष अॅड. फिरदोस मिर्झा ad.firdos mirza ज्येष्ठ विधीतज्ञ, नागपूर खंडपीठ( मुंबई उच्च न्यायालय) अध्यक्ष ,डिजिटल मीडिया पब्लिशर या न्यूज पोर्टल ग्रिवेन्स कौन्सिल ऑफ इंडिया यांनी पोर्टलच्या पत्रकारांसाठी न्याय विषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे विशेष अभिनंदन करावे. ते स्किल डेव्हलपमेंट, आणि आपल्याला पत्रकारिता क्षेत्रात घ्यावयाची काळजी,
डिजिटल मीडिया प्रतिनिधीनां त्यांच्या पोर्टलला अपेक्षित पूर्ण ज्ञान प्रोजेक्टर द्वारे देवनाथ गंडाटे यांनी देऊन
या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची कार्यशाळा घेऊन सांगता केली.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे विधीज्ञ अॅड. आनंद देशपांडे, अॅड. डॉ. कल्याणकुमार आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां अँड पारोमिता गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर वर पत्रकार आनंद आंबेकर, डिजिटलमीडिया असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत,उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सिद्धावर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश एकवनकर यांनी केले.
दुसऱ्या दिवशी सत्रात संपन्न झालेल्या अधिवेशनीय कार्यक्रमात प्रथम सत्र मध्ये शेकोटीवर चर्चासत्र, उपस्थित पत्रकारांच्या परिचय , देवनाथची गंडाटे सदस्य डिजिटल मीडिया ऑफ पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रेव्हीन्स कौन्सिल ऑफ इंडिया यांनी पत्रकारांना संस्थेत विलीन होण्यासाठी व योग्यरीत्या आपले सभासद फॉर्म भरण्यासाठी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले. कुठल्याही संस्थेची सलग्नित असल्याशिवाय आपल्या पोर्टलला मान्यता असणार नाही, त्याचे मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अतिथी झी 24 चे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी पत्रकारांना 'डेटा नाही तर फेटा 'नाही अशा पद्धतीचा मौलिक संदेश पत्रकारांना संबोधित केला. ई टीव्ही भारत चे प्रतिनिधी अमित वेलेकर त्यांनी आपल्या मनोगतातून पोर्टल विषयी हित भूत माहिती पत्रकारांना संबोधित केली. या कार्यक्रमात एल्गार प्रतिष्ठानच्या मुख्य व ज्येष्ठ समाजसेविका एडवोकेट पारोमिता गोस्वामी, त्यांनी आपल्या वैयक्तिक सामाजिक कार्यातील क्षेत्रात पत्रकारांची सात असल्यामुळे या पाळावा पर्यंत पोहोचल्याचे आवर्जून सांगितले. अॅड. फरहात बॅग यांनी पत्रकारांसंदर्भात कायदा, पत्रकारांनी घ्यावयाची काळजी, बातमी लिखाण करताना विशेष करून काळजी कशी घेता येईल, व आपण कायद्याच्या चौकटीत कसे काय बसणार नाही .संदर्भात मार्ग मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या  प्रमुख अतिथी मध्ये एड.डॉ. कल्याण कुमार यांनी  प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पोर्टल  मीडिया, या संदर्भात त्यांना  कौन्सिल ऑफ  अॅक्ट नुसार कोणती काळजी घ्यायची. याबाबत मार्गदर्शन केले.
विशेष करून आपल्याला पोर्टल संदर्भात आपला व्यवसाय बातम्या संदर्भात माहिती घेताना आपला व्यवसाय इतर व्यवसाय करता येईल का? या संदर्भातील विधी तज्ञांनी  मार्गदर्शन केले. या दोन दिवसात सुरू असलेल्या अधिवेशनात मोहलीक माहिती तज्ञांकडून पत्रकारांना  अवगत करता आली.
या यावेळी लंडन वरून शोध पत्रिकेसाठी   चंद्रपूर गडचिरोलीत  आलेले राममोहन थानापुरकर त्यांनी पत्रकारिता आणि समाजामधील चांगले आणि वाईट गोष्टींचा फरक समजावून सांगितला.  विदेशात बातमी द्वारे केलेले  टिकेचे लिखाण, हा समाजाचा भाग समजला जातो. मात्र ईकडे त्याचा विपर्यास पर्याय करून त्याचा वेगळा अर्थ काढला जातो.    विदेशात ट्विटरवर या संदर्भाचा खुलासा केला जातो. अशा प्रकारचे त्यांनी मार्गदर्शन केले
      अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एड.आनंद देशपांडे तज्ञ नागपूर खंडपीठ त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात  पत्रकारिता क्षेत्रात या दोन बाजू असतात चांगला आणि वाईट त्यात कुठली बाजू आपल्याला, अवगत करायची आहे .हे ते लिखाण करताना दक्षता पूर्व पांढरा कागद काळा करायचा आहे. असा मौलिक संदेश त्यांनी पत्रकारांना अध्यक्षीय भाषणातून दिला. लिखाण करताना कुठल्या कछाटात आपण अडकणार नाही .याची काळजी घेऊन पत्रकारिता क्षेत्रात आपण काम केले पाहिजे. कायदा हा दोन्ही बाजूने असून डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेन्स कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था  आहे.बचत गटाच्या  सारखी सर्वप्रथम ही संस्था आपल्या पाठीशी राहील त्याची शहानिशा झाल्यानंतरच आपल्यावर पुढच्या कारवाईस आपण पात्र आहात की नाही. याची शहानिशा करण्याचे काम हे कौन्सिल करणार आहे. असे मनोगत त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन राजू कुकडे यांनी केले. आभार प्रदर्शन जितू चोरडिया यांनी केले .या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पोर्टलच्या सर्व पत्रकारांना  सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या दोन दिवसीय आयोजित अधिवेशनात किमान 45 पत्रकारांनी आपला सहभाग दर्शवला.

,