चंद्रपुरात 68 वे साहित्य संमेलन sahitey samelan , भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चंद्रपुरात 68 वे विदर्भ साहित्य संमेलन चंद्रपुरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ, व सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 16 ,17, 18 डिसेंबरला प्रख्यात विचारवंत आणि लेखक डॉ. वि.स. जोग यांचे अध्यक्षतेत स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात होत असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सरदार पटेल महाविद्यालयाच्या आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी माजी कुलगुरू डॉक्टर कीर्तीवर्धन दीक्षित सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संमेलन कार्याध्यक्ष डॉक्टर प्रमोद काटकर, सूर्याशचे अध्यक्ष इरफान शेख, वि.सा.संघाचे केंद्रीय सदस्य डॉक्टर श्याम मोहरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 16 डिसेंबर 2022 ला सरदार पटेल महाविद्यालयाच्या संयोजनात व भव्य दिव्य ग्रंथदिंडी नंतर दहा वाजता सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी 67 विदर्भ साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष डॉक्टर म.रा .जोशी डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा, डॉक्टर फिरदोस मिर्झा आणि अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील.
संमेलनात ग्रंथ प्रदर्शनी, शिल्प आणि चित्र यांचे जालन राहणार असून तीन दिवस चालणाऱ्या या संमेलन साहित्य आणि सांस्कृतिक वर विचार मंथन होईल.
उद्घाटन समारोह सत्रासह, कथाकथन, पाच चर्चासत्रे, अनुभकथन, निमंत्रणाचे कवी संमेलन चंद्रपूर. गडचिरोली जिल्ह्यातील कवीचे स्वतंत्र कवी संमेलन, सास्कृती कार्यक्रम आणि दोन नाटके संमेलना सादर होतील. 17 डिसेंबर रोजी भानू कुलकर्णी यांच्याद्वारे" कट्यार काळजात घुसली" हे नाटक सादर केले जाणार आहे. यावेळी राष्ट्रीय महागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, प्रामुख्याने उपस्थित राहतील असे माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित यांनी सांगितले.
दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी समारोपीय कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर प्रामुख्याने उपस्थित राहतील.
अशी माहिती झालेला पत्रकार परिषदेत शिक्षण संवर्धन मंडळ, गोंडवना विद्यापीठ व सूर्यास साहित्य व सांस्कृतिक मंच प्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थित होती. होणाऱ्या साहित्य संमेलनाला भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील साहित्यिक व कलावंतांनी सहभागासह चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान केले आहे.