निराधार वृद्धाना 'आधार वाडा' मिळावा म्हणून वृद्धाश्रमाची आवश्यकता - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 जानेवारीला मातोश्री वृद्धाश्रम येथे रोप्य महोत्सवी कार्यक्रम chandrapur



निराधार वृद्धाना 'आधार वाडा' मिळावा म्हणून वृद्धाश्रमाची आवश्यकता - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

26 जानेवारीला मातोश्री वृद्धाश्रम येथे रोप्य महोत्सवी कार्यक्रम...!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-२६/१/२०२३

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा विसापूर सैनिक शाळेजवळ असलेल्या जवळपास पाच एकराच्या परिसरात पसरलेल्या ह्या मातोश्री वृध्दाश्रम च्या रोप्य महोत्सव सोडळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.. भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाचा पंचवीस वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने मातोश्री वृद्धाश्रमाच्या रोप्य महोत्सवासाठी दिनांक 26 जानेवारी 2023 ला सकाळी 1 वाजता संपन्न . या कार्यक्रमासाठी नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उद्घाटक म्हणून तर राज्याचे वन, मत्स्य , सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, , माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, , आमदार कीर्ती कुमार भांगडीया , आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर , विसापूरच्या सरपंच, यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्रीमती शोभाताई फडणवीस, सचिव अजय जायसवाल, यांनी आयोजित मातोश्री वृद्धाश्रम येथे प्रजासत्ताक दिनी  मातोश्री वृद्धाश्रम येथे   रोप्य महोत्सवी कार्यक्रमा निमित्ताने  आयोजन केले होते.
  राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी  म्हटले की,खरं पाहिलं तर राज्यात वृद्धाश्रमाची  गरजच निर्माण व्हायला  पाहिजे नाही, परंतु अनेक निराश्रीत निराधार कुटुंबातील वृद्ध व्यक्तीला आधाराचा 'आधारवाडा' मिळावा म्हणून या वृद्धाश्रमाची   आवश्यकता आहे.

  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या घटनेने आज आपल्याला  हा  सन्मान  निर्माण करून दिला.
मातोश्री वृद्धाश्रम हे वृद्धाश्रम नसून एक परिवार तयार झाला आहे. आणि या परिवारातील   यायचा मला एक आनंद मिळाला आहे. आपल्या सर्वांच्याच काकू श्रीमती शोभाताई फडणवीस यांचे जीवन नेहमी संघर्षातून,  चळवळीतून, आहा जन्म  म्हणून सेवा करण्याची सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. अडचणी वर मात करून ज्या अडचणीला कधीही थांबवू शकले नाहीत तेवढ्यात उत्साहात त्या आजही कार्य करत आहेत. याच्यापेक्षा दुसरा आनंद काय!  कुठलेही अनुदान नसताना 25 वर्ष  वृद्धांची सेवा करणे याच्यामध्ये सेवाभाव असतो.
या ठिकाणी दान करणाऱ्या दात्यांचा  सत्कार केला गेला. ते संस्कार असतात. म्हणून समाजाने दान केले पाहिजे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी यावेळी योग्य प्रतिसाद देत या वृद्धाश्रमाला वॉल कंपाऊंड हे बोलक्या भिंतीची असेल असे जाहीर केले. चिमूर विधानसभेचे आमदार कीर्ती कुमार भांगडीया यांनी 25 लाखाची देणगी दिली. तर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी 50 लाख देणार असल्याचे जाहीर केले. 
   चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारयांनी  शहरातील कोणीही निराधार उपाशी राहू नये यासाठी, अम्मा का टिफिन, सुरू केला असल्याचे सांगितले. दुसऱ्याला मोठे केल्याशिवाय स्वतः मोठा  होता येत नाही! याचे शेर शायरी तुन उदाहरण दिले. उपमुख्यमंत्र्या समोर विविध मागण्यांचे खास करून चंद्रपूर चे आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या बांधकामासाठी पुरातन विभागाने टाकलेल्या जटिल समस्याचे निराकरण करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर चंद्रपूरचे न्यायालय, धानोरा ब्रिज, दीक्षाभूमीसाठी निधी, विविध मागे  पडलेल्या  कामाची पूर्णावृत्ति व्हावे यासाठी   मागणी केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन  रोप्य  महोत्सवी कार्यक्रमास आमंत्रण दिले त्याबद्दल  आयोजकांचे. तर या ठिकाणी या वृद्धाश्रमात वृद्धांचे आशीर्वाद घेताना आनंद वाटतोय!
आश्रम हटवावे की, नाही हे मोठे फार आव्हान होते. मग या वृद्धांनी जायचे कुठे हाय विचार केला.  गावातून आलेले विद्यार्थी, शहरातून गेलेले विद्यार्थी, आणि राज्यातून देश विदेशात गेलेले विद्यार्थी यामुळे पालकांवर  निराश्रीत होण्याची वेळ आली.  संस्काराची अडचण निर्माण झाली.अधिकार, जबाबदाऱ्या  यामुळे राज्यात वृद्धाश्रम सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्र्यांनी या वृद्धाश्रमाला बोलकी असणारे वॉल कंपाऊंड निर्माण करून देण्याची घोषणा केली.  याच बरोबर इथे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊन मी आपल्याला शुभेच्छा शुभकामना देतो. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या कार्यक्रमात संबोधित करताना सांगितले.

       या वृद्धाश्रमाची स्थापना पंचवीस वर्षांपूर्वी सन 1996 ला करण्यात आली. 1996 शासनाकडून  तुटपुंजी निधी मिळाला.   या गोरगरिबांचे  वृद्धाश्रम  बंद करावे की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु या दानसूरदात्यांच्या भरोशावर वृद्धा आश्रम चालूच राहिले.
या वृद्धाश्रमाला जन  सामान्याच्या मदतीने हे वृद्धाश्रम प्रगतीपथावर असून या ठिकाणी आज साठ वर्षावरील वयांचे जवळपास 35 ते 40 वृद्ध महिला पुरुष वास्तव्यास आहेत. इथे वृद्ध महिला पुरुषांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, योगासाठी हाल, दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी,   इथे हळद, पणत्या, मातीची भांडी, छोटे उद्योग, द्रौपदीची थाळी, लोणचे बनवणे, सांडगे बनवणे, शेतीचे काम,अशा विविध उपक्रमातून  त्यांची करमणूक होत असल्याचे स्वाभिमानाने प्रत्येक जन काम करतात असतात.कोरोना काळात वृध्दाश्रमात असलेल्याच्या नातेवाईकांनादूर ठेवून त्यांना भेटण्यासही मनाई करण्यात आल्याने या ठिकाणी कुठल्याही वृद्धाला कोरोना झाला नसल्याचे सांगितले.  वृध्दाश्रमात आलेला प्रत्येक वृद्ध कुटुंबाचा एक भाग आहे. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक दाता  आश्रमाला मदत करतात.   जंगल परिसरात असल्याने वाघ , बिबटे, रानटी डुक्कर, अस्वल या हिस्त्र पशू पासून संरक्षण व्हावं म्हणून या परिसरात मोठे वॉल कंपाउंड व्हावं अशी सदिच्छा शोभाताई फडणवीस  यांनी आपले प्रस्तावना पर भाषणातून मनोगत व्यक्त केले. 

सचिव अजय जयस्वाल,माजी नगरसेवक बलराम डोडाणी, एम. आय. डी चे अध्यक्ष मधुसूदन रूग्ठा, कोठारी,  तसेच या कार्यक्रमाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती होती .