चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, येथे एक आठवड्याच्या एफडीपी कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन




चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, येथे एक आठवड्याच्या एफडीपी कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथे एक आठवड्याच्या एफडीपी कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई द्वारा प्रायोजित व टाटा टेक्नॉलॉजी च्या CIIIT तांत्रिक प्रशिक्षण शाखेच्या सहयोगाद्वारे दिनांक 16 जानेवारी 23 ते 20 जानेवारी 23 या दरम्यान Autonomous Car, Connected Car and Electric Vehicles या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. या एक आठवडा चालणाऱ्या एफडीपीचे आज थाटात उद्घाटन झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून नामांकित टाटा Technlogy, पुणे येथील श्री पुष्कराज कौलगुड, Global Director Electrical Electronics and Software System तर अध्यक्ष डॉक्टर सुधीर आकोजवार, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रशांत वाशिमकर यांनी कार्यक्रमाचे हेतू सांगून केले. संयोजक डॉक्टर गणेश चव्हाण यांनी आपल्या भाषणाद्वारे या एफ डी पी च्या विषयाचे महत्त्व सांगितले. टाटाच्या सी ट्रिपल आयटी सेंटर द्वारे आतापर्यंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जात होते, विद्यार्थ्यांसोबतच अभियांत्रिकीतील अध्यापक वर्गाला सुद्धा सि ट्रिपल आय टी. च्या अद्यावत प्रयोगशाळे व्दारा प्रशिक्षणाचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने या एफडीपीचे आयोजन करण्यात आले असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. संजय राजूरकर यांनी तंत्रज्ञानाद्वारे जग झपाट्याने किती प्रगती करीत आहे याच्यावर आपले मत मांडताना स्वयंचलित वाहने व त्याचे फायदे सांगितले.
तदनंतर डॉक्टर सुशील अंबाडकर यांनी प्रमुख पाहुणे श्री पुष्कराज कौलगुड यांचा परिचय करून दिला.
औद्योगिक क्षेत्रात 30 वर्षा पेक्षा अधिक मोठ्या पदाचा अनुभव असलेले श्री. कौलगुड यांनी आपल्या भाषणात औद्योगिक व शैक्षणिक या दोन्ही क्षेत्रातील तज्ञ लोकांमुळेच देश तंत्रज्ञानात प्रगती करत आहे तसेच एक विद्वान अध्यापकच एक चांगला अभियंता निर्माण करू शकतो असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर आकोजवार यांनी प्रथम या एफडीपी च्या सर्व सहभागी अध्यापकांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी व यापूर्वी सुद्धा एफडीपी प्रायोजित करण्यासाठी त्यांनी माननीय संचालक डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई, व डॉ. मनोज डायगव्हाणे सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय नागपूर यांचे आभार मानले. यंत्र अभियांत्रिकी विभागाद्वारे जरी हा एफडीपी आयोजित करण्यात आला आहे, तरी या विषयामध्ये अनुविद्युत व इतर अभियांत्रिकी शाखेच्या तंत्रज्ञानाचा कसा सहभाग आहे हे समजवून सांगितले. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानामध्ये जीवाश्म इंधनचा वापर कमीत कमी व्हावा म्हणून स्वयंचलित वाहने तंत्रज्ञानामध्ये किती विकास होत आहे यावर प्रकाश टाकला. अशा एफडीपीच्या प्रयोजन मध्ये CIIIT शाखेचा सिहां चा वाटा आहे व आजच्या अभियांत्रिकी अध्यापकांवर या बदलत्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा भार आहे असे त्यांनी सांगितले. आजच्या अभियांत्रिकी अध्यापकांनी समाजासाठी "कल्याण-दूत" म्हणून कार्य करावे असे त्यांनी आव्हान केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक पवन चीलबुले यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीता द्वारे झाली.
या एफ डी पी मध्ये
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती, जळगाव, अवसरी, चंद्रपूर तसेच शासकीय तंत्रनिकेतन आर्वी, गडचिरोली, खामगाव, ब्रम्हपुरी येथील अनेक अध्यापकांनी सहभाग घेतला आहे.
या कार्यक्रमांमध्ये सी ट्रिपल आयटी प्रमुख श्री अरुण कोहली, अनुभवी तज्ञ श्री अनिल केळापुरे, श्री अनील ढोले व टाटा टेक्नॉलॉजी येथील अनेक तज्ञ, तसेच महाविद्यालयातील सर्व अधाय्पक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यंत्र विभागातील सर्वच अध्यापकांनी प्रयत्न केले.