दिव्यांग विवाह सोहळ्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून निस्वार्थ सेवा





दिव्यांग विवाह सोहळ्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून निस्वार्थ सेवा !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:- ११ /२/२०२३
आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा आणि स्व. गौरव बाबू पुगलिया दिव्यांग उपवर- वधू परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी दिव्यांग जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जाते. यावर्षीही 21 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक पार पडणार आहे.
याच कार्यक्रमात दरवर्षी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कडून कटिंग, दाढी, मसाज, नाभिक समाजाकडून निस्वार्थ सेवा करण्यात येते. हा उपक्रम दरवर्षी या विवाह सोहळ्यात दिव्यांग बांधवांसाठी एक दिवसाचा उपक्रम राबवण्यात येतो. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत येणाऱ्या अतिथींचीही निस्वार्थ कटिंग दाढी करण्यात येते.
स्व. गौरवबाबु फाउंडेशनचे सर्वेसर्वा नरेंद्र( श्यामबाबू)  पुगलिया  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ते म्हणाले की, नाभिक समाजातर्फे दरवर्षी  दिव्यांग विवाह सोहळ्यात आपला सहकार्य असतो. असं सहकार्य नेहमी असावं. सेवा करणे हे, ईश्वरी कार्य असून ते निस्वार्थपणे केले तर त्याचा आनंद वेगळाच मिळतो .असे प्रतिपादन श्यामबाबुनी केले.
 हा कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर, सलून संघटनेचे अध्यक्ष राजू कोंडस्कर, बारा बलुतेदार महासंघाचे कार्याध्यक्ष श्याम  राजुरकर, पांडुरंग चौधरी, राजू वनस्कर,  सौरभ कोंडस्कर, दीपक चौधरी , मेघश्याम  चावके, मनोज जांभुळकर, दिनेश चौधरी,  यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम केले.