कर्जमाफी,अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांच्या नोंदणीला प्रतिसाद.





कर्जमाफी,अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांच्या नोंदणीला प्रतिसाद.

मनसेने वरोरा शहर व ग्रामीण भागात सुरू केलेल्या या नोंदणी अभियानात हजारो शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन.

दिनचर्या न्युज :-
वरोरा :-
राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व उद्धव ठाकरे यांच्या नेत्रुत्वात महाविकास आघाडी सरकार यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांचे थकित कर्ज माफ करण्याची घोषणा केली परंतु या दोन्ही सरकारच्या काळात वरोरा भद्रावती तालुक्यात जवळपास ११०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. तर २ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. अशा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या नेत्रुत्वात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदने देण्यात आली परंतु शेतकऱ्यांची संख्या निश्चित किती आहे व ते कोणते शेतकरी कर्जमाफी व अतिवृष्टी च्या अनुदानापासून वंचित आहे. याचा अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठविण्यासाठी मनसेने वंचित शेतकऱ्यांच्या नोंदणीचे अभियान राबविले आहे.
शेतकऱ्यांना शहरात येण्यास वेळ नसतो. यांची काळजी घेऊन मनसेने ग्रामीण भागातील सेतू केंद्रात शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, यात रेवती झेरॉक्स सेंटर तहसील कार्यालयासमोर वरोरा यांसह प्रथम कंप्यूटर चिमूर रोड शेगांव, लारा ऑनलाईन सेंटर माढेळी, अतुल गावंडे एंटरप्राइजेस एजुकेशन चिकनी, आकांशा आपले सरकार सेवा केंद्र नागरी, अभय इंटरनेट कॅफे टेमुर्डा
श्रावणी ऑनलाईन सेवा केंद्र खांबाडा इथे फॉर्म भरून आपली नोंदणी करावी असे आवाहन मनसेचे विशाल देठे, राम पाचभाई, प्रशांत बदकी, गजू वादाफळे, मोहित हिवरकर, श्रीकांत तळवेकर, अभिजीत पावडे, प्रणय लोणकर, विनोद खडसंग,राजेंद्र धाबेकर, मनोज गाठले, पवन ढोके, जयंत चौधरी, पंकज पेटकर,धनराज बाटबर्वे,शंकर क्षीरसागर, मनोहर खिरटकर, चिंतामण बेले,अतुल गावंडे, दिलीप दोहतळे, अभय आसूटकर, प्रमोद हनवते, अशोक दाते, महेंद्र गारघाटे,दिनेश जुमडे,शुभम नरड.संदीप घुबडे यांनी केले आहे