पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या संपत्तीची चौकशी करून , बडतर्फ करा - सुरज ठाकरे
पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या संपत्तीची चौकशी करून , बडतर्फ करा - सुरज ठाकरे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते तेव्हा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. स्वप्निल धुळे यांनी त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या नावे चंद्रपूर मुल रोडवर निल रिसॉर्ट बनवलेले असून त्यांच्या राहत्या घरासाठी देखील करोडो रुपये चे बांधकाम केले असून सदर पैसा हा त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या आय पेक्षाही अधिक असल्यामुळे त्यांच्या संपत्तीची चौकशी करून अवैध मार्गाने जमवलेली संपत्ती जप्त करण्या संदर्भात तसेच यांचेवर पोलीस खात्यातून बडतर्फी करण्याची मागणी तक्रारीतून युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
नुकतेच दुर्गापुर पोलीस स्टेशन येथून बदली होऊन स्थानांतरित झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. स्वप्निल धुळे dhule यांची शासकीय कार्यकाळ व कारकिर्दी नेहमीच वादग्रस्त ठरलेली असून असंख्य तक्रारी सदर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे भ्रष्टाचार करून संपत्ती जमवत असल्याबाबत आम्हास प्राप्त झाल्या, त्यावरून शहानिशा केली असता खरोखरच त्यांचे व त्यांच्या पत्नीच्या आय पेक्षा अधिक संपत्ती असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याची माहिती ठाकरे takare यांनी सांगितले.
चंद्रपूर ते मुल रोडवर बोर्डा गावा आधी नील रिसॉर्ट म्हणून भव्य रिसॉर्टचे काम सुरू असून या रिसॉर्ट चे मालक हे पोलीस निरीक्षक धुळे असल्याबाबत माहिती मिळाली आहे. याशिवाय त्यांनी स्वतःच्या किंवा स्वतःच्या पत्नीच्या नावे अनेक शेतजमिनी विकत घेऊन ठेवलेले आहेत. तसेच त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरी देखील त्यांनी करोडो रुपयांचे बांधकाम व इंटेरियर केलेले आहे. एकंदर यांची मालमत्ता व बांधकामावर केलेला खर्च पाहता यात काही शंका नाही की,आय पेक्षा अधिक संपत्ती यांनी जमा केली व खर्च केलेला आहे. त्यामुळे कृपया यांच्या संपत्तीची चौकशी करून यांचेवर बडतर्फ (Dismis) कार्यवाही करून अवैध मार्गाने जमवलेली संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
यापूर्वी देखील याच विषयावर शासनाकडे तक्रार अर्ज दिला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमानासमोर सुरज ठाकरेनी सांगितले.
तो तक्रार अर्ज देखील या तक्रार अर्जासोबत जोडलेला असून . या गंभीर तक्रारीकडे व विषयाकडे लक्ष देऊन चौकशी कराल अशी  मागणी करण्यात आली आहे.
      या संदर्भात वरिष्ठ पोलीस  निरीक्षक स्वप्निल धुळे यांना  भ्रमणध्वनी द्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनी  उचलला  नाही. त्यामुळे माहिती मिळू शकली नाही.