वरोरा चौक उडानपुला खाली टाटा टिआयगो गाडीचा भीषण अपघात
वरोरा चौक उडानपुला खाली टाटा टिआयगो गाडीचा भीषण अपघात

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- ३/३ /२०२३
शहरातील अतिशय वर्दळीचा असलेल्या वरोरा नाका उडान पुलाच्या चौकात आज टाटा टी आयगो गाडी नंबर MH31 fE 3920 चा भीषण अपघात झाला. सूत्राच्या माहितीनुसार गाडी चालक हा मधधुद अवस्थेत असल्याने गाडीवरील नियंत्रण अन बॅलेन्स झाल्याने उडान पुलाच्या डिव्हायडरला जोरदार धडक दिल्यामुळे गाडीचा समोरचा भाग चकनाचूर झाला. सुदैवाने या अपघातात ती जीवित हानी झाली नसली तरी, वाहन चालक मात्र गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गाडीचेही नुकसान झाले आहे.
वरोरा नाका चौकात नेहमीच उडान पूल झाला तेव्हापासून अनेक भीषण अपघात तर झालेच पण नेहमी छोटे मोठे या चौकात अपघाताची  मालिका नेहमी सुरू असते. या चौकात वाहतूक विभागाने  ब्रेकर, सिग्नल ची व्यवस्था करण्याची मागणी ही नागरिकांकडून होत आहे. नाहीतर भविष्यात  मोठी दुर्घटना होण्याचे  नाकारता येत नाही.