अन्न व औषध निरीक्षक यांचा अपघातात मृत्यू





अन्न व औषध निरीक्षक यांचा अपघातात मृत्यू

अनियंत्रित कार झाडावर आदळली

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर(नागभीड.).
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चंद्रपूरहून नागपूरकडे जाणारी कार नागभीड तालुक्यातील चिंधी चक फाट्याजवळ झाडावर आदळली. या अपघातात वाहनातून प्रवास करणाऱ्या चंद्रमणी कानोजी डांगे (51) यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी सुमना डांगे (48) या जखमी झाल्या आहेत. त्यांना ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत चंद्रमणी हे चंद्रपूर येथे अन्न व औषध निरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते चंद्रपूर येथील ताडोबा येथे सफारी साठी आले होते. सफारी करून
डांगे कुटुंबीय नागपुरात घरी जात होते : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रमणी डांगे, पत्नी सुमना आणि 2 मुलांसह कार क्र. MH 40 AC 3083 नागपूरला
जात होतो त्याचा मित्र अभिजीत अजितकर दुसऱ्या वाहनात होता. 17 ते 19 मे दरम्यान दोन्ही कुटुंबांनी ताडोबा मोहर्ली गेट येथील हॉटेलमध्ये विश्रांती घेतली.

, चंद्रपूर-नागपूर रस्त्यावर अपघात झाला
शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास चिचपल्ली येथील धनकुटे यांच्या हॉटेलमध्ये जेवण करून दोन्ही कुटुंब मूळ मार्गाने नागपूरकडे निघाले. नागपुरातील रविनगर अग्रसेन भवनाजवळ डांगे कुटुंबीयांचे घर असल्याने ते तिकडे जात होते. चंद्रमणी स्वतः गाडी चालवत होते. त्यानंतर त्यांच्या वाहनाचा तोल गेला आणि कार झाडावर जाऊन आदळली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. यामध्ये चंद्रमणी यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, सुमनाला दुखापत झाल्याने ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही मुलांना किरकोळ दुखापत झाली. आजूबाजूच्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली.