पीएम घरकुल लाभार्थ्यांचे तत्काळ निधि न दिल्यास महापालिके विरोधात तीव्र आंदोलन : राहुल देवतळे
पीएम घरकुल लाभार्थ्यांचे तत्काळ निधि न दिल्यास महापालिके विरोधात
तीव्र आंदोलन : राहुल देवतळेदिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक गरीब आणि गरजूला पक्के घर देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मात्र हे आश्वासन चंद्रपूरच्या विठ्ठल मंदिर प्रभागासह शहरात पांढरा हत्ती ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना निधि न दिल्यामुळे गरीब व गरजू लोक चंद्रपूर महानगरपालिकेत चकरा मारून हैराण झाले आहेत. मात्र महापालिका प्रशासनाला या गरीब लाभार्थ्यांची काळजी दिसत नाही. या पालिका प्रशासनांना झोपेतून जागे करून लाभार्थ्यांना तातडीने बिले द्यावीत यासाठी आज गांधी चौक महानगर पालिका कार्यालयासमोर राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. गरीब लोकांना त्यांच्या हक्काची घरे देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना लागू करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महापालिका प्रशासनाने गेल्या पाच वर्षांत केवळ 407 लाभार्थ्यांना घरे मंजूर केल्याने अनेकांना त्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पडले आहे. मात्र पालिका प्रशासनाने शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागासह इतर वार्डातील अनेक नागरिकांना या योजनेपासून वंचित ठेवले आहे, तर ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे, त्यांना अद्याप बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अनेकांच्या घरांचे काम अजूनही अपूर्ण आहे. अनेकांनी इतरांकडून पैसे घेऊन घरबांधणीची कामे सुरू केली होती. या योजनेची बिले मिळाल्यास ते कर्जाचे पैसे परत करतील, अशी आशा त्यांना होती.

अनेकांनी घरांसाठी दुकानदारांकडून उधारीवर साहित्य घेऊन कामे सुरू केली आहेत. मात्र अद्यापपर्यंत लाभार्थींना बिल न मिळाल्याने ते महानगर पालिका कार्यालयात चकरा मारत आहेत. संबंधित अधिकाऱ्याला बिलाबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे या गंभीर समस्येची माहिती दिली होती. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अखेर आज गांधी चौकात राहुल देवतळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका व जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजीव कक्कर, माजी नगरसेवक जैस्वाल, संभा खेवले, जनार्दन गायकवाड, शुभम भोयर, गौरव गोरे, कुमार पाल, विपीन झाडे, सतीश मांडवकर, वसंता पवार, दिलीप ठाकरे, किशन झाडे, प्रतिभा खडसे, अश्विनी निखाडे, शुभांगी जाधव, डोईफोडे, मीराबाई थोरात, संगीता ताई बावणे, करुणा थोरात, सुरज जाधव, छायाताई जाधव, प्रतिभा जाधव, गणेश उमाटे, विक्रम अंबीरवार, सुनील कोपरे, दिलीप ठाकरे, संजू जीजेलवार, सुधाकर गर्गेलवार, आशिष गोडे, शुभम ठकारे, विपीन लांगे, पप्पू गाडीवान, वसंता पवार, संजय कुकडकर, नीलेश निवाळकर, गणेश उमाटे, आशिष गौड यांच्यासह शेकडो लाभार्थी उपस्थित होते. बिल त्वरित न दिल्यास पंधरा दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देवतळे यांनी दिला.