...या तालुक्यातील पाच खंडणी बहादरांना अटक
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (नागभीड)
नागभीड येथील तहसील कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पन्नास हजारांची खडांणी पाच युवकांनी मागितली होती.त्या पाच युवकांना ब्रम्हपुरी न्यायालयाने जेलमध्ये रवानगी केली आहे.
दिनांक 19/2/2024 चे रात्रौ १०.००वाजताच्या सुमारास आरोपी अभिषेक आलोने वय २३,रा.कुंघडाचक,विशाल ठाकरे २०,र. मांगली ( अरब ),सौरभ वाघाळे २६, रा.बामणी,पटवर्धन भाकरे २३,मृणाल भैसारे २० रां. नागभीड, हे पाच जण तोंडाला मुस्का बांधून आरोपीच्या राहत्या घरात प्रवेश करून ५० हजार रुपयाची मागणी करू लागले .त्यावेळी फिर्यादिने ११०००रुपये मोबाईल वरून दिले .त्यांचे समाधान झाले नाही.परत पैशांची मागणी करू लागले तेव्हा त्यांच्या विरुद्ध nagbhid पोलिसात तक्रार दिल्यावरून त्या पाचही आरोपींना अटक करून भादवी.४५२,३९५,३८५,सहकल्म १३५ नुसार गुन्हा नोंविण्यात आला .त्यांना ब्रम्हपुरी न्यायालयात हजर केले असता आरोपींना जेलमध्ये रवानगी केली. नागभिडचे नवीन ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सपोनी,सायाम तपास करीत आहेत.