डॉ. राजेश नाईक यांचे "89" वे रक्तदान nagpur
डॉ. राजेश नाईक यांचे "89" वे रक्तदान

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
"मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे ", या उक्तीला अनुसरून शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून शहीद दिनाच्या निमित्ताने अतीविषेशोपचार रुग्णालय ( सुपर स्पेसिऍलिटी हॉस्पिटल ), नागपूरच्या रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सागरजी गवई, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रुपाली कावळे, स्टाफ नर्स प्रफुल्ल सोनटक्के, अंकित रामटेके यांच्यासह इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विशेषज्ञ समूह समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदचे सदस्य, डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूरच्या नियामक समिती आणि कार्यकारी समितीमधिल मा. जिल्हाधिकारी महोदयांचे प्रतिनिधी आणि सदस्य, नागपूर शहर केंद्रीय पोलिस शांतता समितीचे सदस्य आणि आखिल भारतिय मराठी नाट्य परीषद, नागपूर शाखेचे कार्यकारीणी सदस्य आणि श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेश नाईक यांनी अती विषेशोपचार ( सुपर स्पेसिऍलिटी हॉस्पिटल ) रुग्णालय, तुकडोजी पुतळा चौक, मानेवाडा रोड, नागपूरच्या रक्तपेढीमध्ये जाऊन आपल्या "89" व्या रक्तदानाची फेरी पूर्ण केली.

या निमित्ताने श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थेच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदाता कार्ड, रक्तदानाचे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करून प्रा. डॉ. राजेश नाईक यांना उपकृत करण्यात आले.