राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
तिन्ही राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांचेविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांची कारवाई
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
अॅन्ड रेस्टॉरंट" या नावाने बार आहे. तकादार यांना नवीन बिअर शॉपीचा परवाना काढायचा असल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर येथे परवाना मिळण्याकरीता अर्ज सादर केला होता. परंतु आलोसे क. ०१ श्री. संजय पाटील, आणि ०२ श्री. चेतन खारोडे यांनी तकादार यांना आज या, उदया या असे म्हणून टाळाटाळ केली व परवाना मंजुर केला नाही. आलोसे क्रमांक ०२ चेतन खारोडे यांनी तक्रारदार यांना बिअर शॉपीचा परवाना मंजुर करून देण्याचे कामाकरीता आलोसे क. ०१ श्री. संजय पाटील यांचे व स्वतः करीता १,००,०००/-रू. ची मागणी केली होती. तक्रारदार यांची श्री. संजय पाटील, अधीक्षक आणि श्री. चेतन खारोडे, दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांना लाच म्हणून १,००,०००/-रु. लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने श्री. १) श्री. संजय पाटील, अधीक्षक, २) श्री. चेतन खारोडे, दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांचे विरुध्द लाप्रवि, कार्यालय चंद्रपूर येथे
तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून दिनांक २५/०४/२०२४, दिनांक ०३/०५/२०२४, ०७/०५/२०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी/सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे क. ०२ श्री. चेतन खारोडे, दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर जि. चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना १,००,०००/-रू. ची मागणी करून आलोसे क. ०३ श्री. अभय खताळ, कार्यालय अधीक्षक यांचे मार्फतीने स्विकारली. त्यावरून आज दि. ०७/०५/२०२४ रोजी पो.स्टे. चंद्रपूर शहर, जि. चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र. वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, पो. हवा. हिवराज नेवारे, ना.पो.अं. संदेश वाघमारे, पो. अ. राकेश जांभुळकर, पो.अ. प्रदिप ताडाम, म.पो.अं. पुष्पा काचोळे व चापोकों सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.
चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.