घरगुती सिलेंडर वितरकाकडून वजन करून घ्या-ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
घरगुती सिलिंडरचा अवैध वापर मोठ्याप्रमाणात होत आहे. सरकारी गॅस कंपन्यांचे अधिकारी व वितरकांची मिलीभगत असून सरकारने हा काळाबाजार थांबावावा, अशी मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन केली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक ठिकाणी ६० टक्के वापर होत असून सरळ १४.२ कि.ग्रा. सिलिंडरचा वापर ३५
टक्के; तर १४.२ कि.ग्रॉ याच्या सिलिंडरधमून १९ कि.ग्रा. अथवा अन्य व्यावसायिक सिलिंडरमध्ये वाहतुकीच्या माध्यमातून २५ टक्के धोकादायक पद्धतीने अवैधपणे वापर होत असून आपल्या घरी येणारा प्रत्येक गॅस सिलेंडरचा हंडा नियमाप्रमाणे वजनात आहे का? त्याचे वजन माफ ग्राहकांनी करून घेतले पाहिजे. अनेक वेळा डिलवरी बाय तर सकट ग्राहकाची दिशाभूल करीत असतो. कुठल्याही एजन्सी वाल्याला अतिरिक्त सर्विस चार देण्याची गरज नाही. येणाऱ्या बिलातच त्याचे सर्विस चार्ज लागून असतात. व्यवस्थित त्याच्याकडून गॅस चेक करून घ्यावे, त्याच्याकडून मिळणारी पावती, बुकामध्ये त्याची नोंद करून घ्यावी.
अशी माहिती पत्रकार परिषदेत यांनी दिली. देशात एलपीजी वाहनात सुध्दा घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑटो एलपीजी वाहनाच्या दररोजच्या खपतच्या तुलनेत ७० टक्के वाहनचालक हे घरगुती सिलिंडर अतिशय धोकादायक पद्धतीने एका ईलेक्ट्रिक मोटारपंपाच्या सहाय्याने एल.पी.जी वाहनात भरतात. यामुळे मोठे अपघातही झाले आहेत. पंरतु ऑटो एल. पी. जी पंप वरून केवळ ३०
टक्केच अधिकृत एलपीजीची विक्री होत आहे. एकूण वाहनाची अंदाजे संख्या २.३८ दशलक्ष असून दररोज त्यात नवीन एल.पी.जी वाहनांची वाढ होत आहे. कारण एल.पी.जी हे सुरक्षित तसेच स्वस्त इंधन आहे.
वाहनामध्ये तसेच व्यावसायिक कामासाठी घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना ३०० रुपयात मिळणारे सिलिंडर अकराशे रुपयांत विकत घ्यावे लागत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर थांबविल्यास सामान्य नागरिकांना तिनशे रुपये दराने सिलिंडर देता येऊ शकते. आमची संघटना याअन्यायाच्या विरोधात लढा देत असून सर्वसामान्य नागरिकांना जागृत करण्याचे काम करीत आहे. गॅसची हेराफेरी करताना देशभरात एका वर्षात जवळपास पंधराशे दुर्घटना घडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गॅसबाबत पारदर्शक धोरण अवलंब करणे गरजेचे आहे. बारकोड जीपीएस अशा अनेक पद्धतींचा वापर करून घरगुती सिलिंडरच्या वापरातील गैरप्रकार संपुष्टात आणल्या जाऊ शकतो. मात्र, गॅस वितकरांच्या संघटना याला विरोध करीत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी समोर येऊन सरकारवर दबाव निर्माण करावा, असे आवाहन सुद्धा नितीन सोळंके यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला प्रशांत जामगडे, किरण आठवले, हंसराज रहांगडले उपस्थित होते.
शासनाचा करचोरीने नुकसान
घरगुती सिलिंडरचा वापर व्यावसायिक कामासाठी केला जातो. यामुळे सरकारला मिळणारा टॅक्ससुद्धा मिळत नाही. विशेष म्हणजे देशभरात खुलेआम घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक कामासाठी वापर केला जात असल्याने जीएसटीच्या माध्यमातून सरकारला मिळणारे कोट्यवधींचे उत्पन्न डुबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घर प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी दक्षता पथकांची निर्मिती करण्याची मागणी सुद्धा यावेळी पत्रकार परिषदेतून ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यांनी केली.