उद्यापासून चंद्रपुरात पोलीस भरती, प्रक्रिया पारदर्शक होणार - पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का




उद्यापासून चंद्रपुरात पोलीस भरती,
 प्रक्रिया पारदर्शक होणार - पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर पोलीस दलाच्या आस्थापनेवर 19 /6 /2024 पासून सकाळी पाच वाजेपासून जिल्हा क्रीडा संकुलन चंद्रपूर येथे पोलीस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर 137 पोलीस शिपाई व ९ बँड्समन रिक्त पदे भरण्यात येणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी एकूण 22 5 83 आवेदन प्राप्त झाले असून13443 पुरुष उमेदवार तर 6315 महिला आणी 2 तृतीयपंथी उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात पुरुष 2176 आणि महिला उमेदवार 646 तर एक तृतीयपंथी उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुलनात होत असलेल्या उमेदवाराचे ओळखपत्र आधार कार्ड आत मध्ये उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे घेऊनच प्रवेश दिला जाईल. मैदानावर सर्व शारीरिक चाचण्या घेतल्या जातील. उमेदवाराने कोणतेही उत्तेजनार्थ पदार्थ सेवन करणार नाही याची खबरदारी घ्यावी. जर आढळल्यास कारवाई करण्यात येईल. भरती प्रक्रिया ही पारदर्शक व सी सी कॅमेरा च्या निगराणी घेण्यात येणार आहे. कुठल्याही उमेदवारांनी आमिषाला बडू पडू नये. पोलीस शिपाई म्हणून भरती करून देता असे कोणी बोलत असल्यास त्याची तक्रार लाच लूचपत प्रतिबंधक विभाग, आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करावी. बाहेर जाऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रात्री झोपण्यासाठी पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे डील सेडमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेस कुठे व्यत्यय आल्यास त्याची पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. हि पोलीस भरती अतिशय पारदर्शक होणार आहे.
असे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक
सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू त्यांनी सांगितले.