काळजाचा तुकडा.....!! हृदय हेलवणारी घटना ! सावधान:- आपणही फ्रॉड कॉल चे शिकार होऊ शकता ? स्वयम आणि तत्परता ठेवा- धनंजय साळवे




काळजाचा तुकडा.....!! हृदय हेलवणारी घटना ! सावधान:- आपणही फ्रॉड कॉल चे शिकार होऊ
शकता ?
संयम आणि तत्परता ठेवा- धनंजय साळवे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
प्रत्येकाच्या हृदयात काळजाच्या तुकड्या (जीव तुझ्यात माझा गुंतला) बाबत एक वेगळे स्थान असते. कारण प्रत्येक आईबाप आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी धडपडत असतो जगत असतो व मेहनत करत असतो हे नाकारने शक्य नाही. जर आपल्या अपत्यावर काही आपदा आली तर अक्षरशः जी परिस्थिती निर्माण होते ती माता पित्यांनाच माहिती. शेवटी प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्य समजून मुलांच्या कल्याणासाठी सर्वकाही पर्याय शोधून वेळेप्रसंगी ते स्वाभिमान सुद्धा गहाण ठेवत मुलांचे आयुष्य घडविण्याचा कसोशीचा प्रयत्न करतात हे निर्विवाद सत्य आहे.
असाच एक प्रसंग आज अनुभवयला आला.कार्यालयीन कामे करत असताना अचानक एक फोन येतो आणि पुढील व्यक्ती असा म्हणतो की, तुमच्या मुलांनी असा-असा कारणामा/प्रताप केला असून त्याला त्यातून बाहेर काढायचे असेल तर तुम्हाला मी दिलेल्या नंबर वर पैसे पाठवावे लागतील. विषय असा निर्माण होतो प्रत्येक आई-वडिलाला असे वाटते नाहीतर विश्वास आहे की, माझा मुलगा असली चुकीची कृती करू शकत नाही व भविष्यात सुद्धा करणार नाही कारण त्यासाठी त्यांनी कष्ट वेचलेले असतात *ते संस्काराचे, मेहनतीचे. त्यावेळी त्या मातपित्यांची अवस्था काय होत असेल त्यांची कल्पना करणे शक्य नाही.ज्यांना असे फ्रॉड कॉल येतात त्यांना कल्पना आहे. कदाचित एखाद्या आई-वडिलांचे याप्रसंगी निधन हार्ट-अटॅक मुळे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तोच प्रसंग आज मी प्रत्यक्ष अनुभवला. फक्त सांगायचे एवढेच आहे की, आपण संयम ठेवा विषय समजून घ्या, कारण आपल्या मुलांवर गैरविश्वास आपण ठेवूच शकत नाही. त्या पद्धतीने मुलांना संस्कार देण्याचे कार्य ईश्वराचे आदीस्वरूप जीचा दर्जा प्रथमस्थानी आहे. ती घरातली गृहिणी , आई, मा, मम्मी, मम्मा सह अनेक नावाने संबोधतो. त्या आईचे संस्कार मुलांना चुकीचे धडे शिकवू शकत नाही त्यामुळे थोडे शांत रहा आणि अशा फ्रॉड-कॉल ला चोख उत्तर द्या आणि शक्य होत असेल तर नक्की आपली मायबोली मराठी भाषा बोला* व त्यांना सांगा की मला हिंदी अजिबात येत नाही. कदाचित ते फोन ठेवून देतील. परिस्थिती एकदा समजून घ्या इतरांकडून वा स्वतःआपल्या मुलांना संपर्क करा व विचारपूस करा. मला जेव्हा फोन आला तेव्हा अक्षरश: मी घाबरून गेलो व जी माझी अवस्था निर्माण झाली ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यावेळी जर गडचिरोलीच्या ज्येष्ठ सहायक गजभिये मॅडम आणि माधुरीताई पंचायत समिती चंद्रपूरच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी या जर नसत्या आणि काही वेळात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लढणारे सुरमवार साहेब हजर नसते तर कदाचित अनुचित घटना घडली असती. मात्र ज्यांची भावना सकारात्मक आहे त्यांच्या पाठीशी कुणीतरी असतो आणि नक्की असतोच याबाबत माझे दुमत नाही. त्यामुळे तो प्रसंग मला टाळता आला. लगेच सुरमवार साहेबा सोबत आम्ही रामनगर पोलीस स्टेशन येथे पोहोचल्यानंतर सदर परिस्थिती उपस्थित पोलीस उपनिरीक्षक त्यांना समजावून सांगितली आणि कळले की सदर कॉल हा फ्रॉड काल आलाय आणि फ्रॉड कॉल आहे.....
फ्रॉड काल पासुन सावधान रहावे असे आवाहन धनजय साळवे यांनी माध्यमाशी संवाद साधताना केले. 
   इतर लोकांना यापासून सावध करण्यासाठी मी हा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचतोय. बस्स एवढेच...!🙏🏻