व्यसनमुक्ती सेवा केंद्राद्वारे 11 लोकांनी घेतला दारू व्यसनमुक्तीचा संकल्प




व्यसनमुक्ती सेवा केंद्राद्वारे
11 लोकांनी घेतला दारू व्यसनमुक्तीचा संकल्प


व्यसनमुक्ती सेवा केंद्राद्वारे
दर शुक्रवारला सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन संकल्प द्वारे लोक व्यसनमुक्त होणार


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
परमपूज्य संतोष महाराज यांच्या शुभहस्ते परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्राचा विचोडा (बू) तालुका जिल्हा चंद्रपूर रिबीन काटून परमपूज्य शेषराव महाराज यांच्या फोटोची पूजा करून शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच शुभारंभ च्या दिवशी आजूबाजूच्या गावातून आलेल्या अकरा लोकांनी परमपूज्य संतोष महाराज यांच्याकडून दारू व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला. आणि नवीन व्यसनमुक्त जीवनाची त्या अकरा लोकांनी सुरुवात केली *. श्री अनिल डोंगरे प्रदेश महासचिव तथा जिल्हाध्यक्ष व प.पू शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून या सेवाभावी व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. भविष्यात या केंद्राच्या माध्यमातून दारू व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना व्यसनमुक्त होण्यासाठी हे केंद्र फायदेशीर ठरणार असून या केंद्राच्या माध्यमातून दर शुक्रवारला सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान दारू व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन व संकल्प देऊन हे कार्य सुरू असणार आहे.* यावेळी श्री.आकाश क्षीरसागर जिल्हा कोषाध्यक्ष श्री अविनाश राऊत जिल्हा सचिव श्री प्रकाश अलगमकर जिल्हा सदस्य श्री पंकज ठाकरे श्री.प्रमोद जाधव श्री. गजानन महल्ले श्री.वसंतराव महल्ले श्री देविदास कौरासे श्री चंदू थिपे यांची उपस्थिती होती.