विकास पुरुषांचे नाव मंत्र्याच्या यादीतून वगळणे म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला खिंडाळ !




विकास पुरुषांचे नाव मंत्र्याच्या यादीतून वगळणे म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला खिंडाळ !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapurhtml.
सुधीर मुनगंटीवार हे भाजपातील वजनदार नेते, विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. राज्यात ते तीनदा मंत्री राहिलेत. अर्थमंत्री व वने मंत्री, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून राहिले. साडेसात वर्ष पालकमंत्री म्हणूनही त्यांची यशस्वी कारकीर्द राहिली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
एकंदरीत भाऊ सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. अशा ज्येष्ठ नेत्याला भाजपाने मंत्री पदापासून का म्हणून डावलावे हा मात्र चंद्रपूरकरांसाठी ही बाब म्हणजे जिल्ह्याच्या विकासात खुंटवणारी आहे.
हा चंद्रपूर जिल्ह्यावर फार मोठा अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया आता चंद्रपूरवासियांकडून व्यक्त होवू लागल्या आहे.
आपल्या विदर्भात ते तीस वर्षानंतर नागपूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत होता. त्यावेळी विदर्भाचे ज्येष्ठ नेते विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रिमंडळाच्या यादीत नाव नसल्याने निराशा झाली. जिल्ह्यालाच मंत्रीपद नसल्याने चंद्रपूर जिल्हा पोरका झाल्याचा संताप व्यक्त होत आहे.
अर्थमंत्री असताना जिल्ह्याच्या विकासात झंजावत निर्माण केला. पन्नास कोटी वृक्षारोपण करीत त्यांनी ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्थान मिळवले, शिवरायांची वाघ नखे सुद्धा आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला.
 मोदी यांनी देखील ‘मन की बात’मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेतली होती. 
 अशा ज्येष्ठ नेत्यांना मंत्री पद मिळणे गरजेचे होते.
 मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे रोपट आता वटवृक्ष झालं होतं. अभेद किल्ला बांधण्यामध्ये मुनगंटीवार यांचे अमूल्य योगदान आहे.
 दिलेला शब्द, संधीचे सोने करण्यात   सुधीर भाऊ यांचं नाव अग्रस्थानी राहिलं आहे. त्यामुळे विरोधकांनाही  आणि पक्षांतर्गत ही बाब पोहोचणारी राहिली.
'गर्जा महाराष्ट्र माझा' याला राज्यगीताचा दर्जा ही मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री असतांना देऊन या खात्याची गरिमा मोठी केली. हॅलो मन्या ऐवजी ' वंदे मातरम' मन्या सुरुवात केली. अशा  द्रृष्ट , अभ्यासू,   दूरदृष्टी, जे बोलतो ते करतो, सातत्याने पत्रव्यवहार, विकासाची कामे खेचून  आणणारा प्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख  असं सर्व काही त्यांच्याकडे असताना देवा भाऊच्या मंत्रिमंडळातून देण्यात आलेला डच्चू हा आकस भावनेतून  की कटकारस्थान रचून जाणीवपूर्वक  भाऊंचा खच्ची करण्याचा राजकीय हेतू तर नाही ना ,असं आता चंद्रपूरकरांना वाटू लागला आहे.
 मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाऊंचे नाव यादीत असल्याचे सर्वीकडे प्रसार माध्यमाकडे सांगण्यात आले होते. परंतु सर्व मंत्र्यांना शपथविधीसाठी  फोन गेले, एअरपोर्ट सुविधा निर्माण करून दिल्या गेल्या. अखेरच्या क्षणापर्यंत भाऊंना मंत्रिमंडळाच्या कार्यालयाकडून फोन न आल्याने  अखेर भाऊ निराश झाले. एवढी सावधगिरी  भाऊंपासून राज्य सरकारने  भाऊ पहिल्यांदाच बाळगली. मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुनगंटीवार यांना स्थान दिले नाही गोपनीयता  कटकशाने बाळगण्यात आली. देवा भाऊच्या आणि  भाऊ वर होणाऱ्या कटकारस्थानाची गोटात   कुणकुण पूर्वीपासूनच होती. की यावेळेस  जिल्ह्याचे मंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती असलेल्या चिमरातून तीनदा आमदार निवडून आलेल्या  भांगडिया यांच्या कोट्यात अनारस याची चर्चा होती? परंतु पक्षात वादग्रस्त निर्माण होईल म्हणून जिल्ह्यात कुठलेही मंत्रीपद न देता जिल्हा  पोरका ठेवण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मंत्री मंडळ विस्तारानंतर घेतलेल्या पत्र परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना ज्यांना डावलण्यात ज्यांचे 'परफार्मेन्स' निराशाजनक राहिले असेल किंवा वरिष्ठ स्तरावर पक्ष डावलेल्याना दुसरी जबाबदारी देणार त्यामुळे ते वगळण्यात आल्याचे सुतोवाच केले. मोठे बहुमत असलेला भाजप आज राज्यात सत्तास्थानी आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ६ पैकी ५ जागांवर भाजपचे आमदार निवडुन आले आहेत आणि जिल्ह्यात एक सुद्धा मंत्री पद देण्याचे औचित्य न बाळगणे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला बाधा निर्माण करणारी ठरू शकते, चंद्रपुर जिल्ह्यांवर अन्याय करणारी आहे, अशी प्रतिक्रिया आता मतदारांमध्ये व्यक्त होवू लागली आहे.
 जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून याचाही फटका  वरिष्ठ नेत्यात झालेल्या चर्चेत  निवडणुकीपूर्वी दिसून आला.
 देशाचे गृहमंत्री अमित शहा चंद्रपूर जिल्ह्यात प्रचारार्थ आले असता  मंचावर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे न बघता, त्यांचे नावही न घेता! तेव्हा चंद्रपूरकरांना वरिष्ठ स्तरावर भाऊंची गोची तर होत नाही ना! अशी चर्चा शहरात रंगत होती!
 मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसमोर सांगितले की, त्यांचा परफॉर्म, आणि केंद्रामधून मुनगंटीवार यांना, मोठी जबाबदारी मिळत असल्यामुळे त्यांना नाकारण्यात वरिष्ठ  स्तरावरून आले असे सांगण्यात आले असले तरी   खरे कट कारस्थान कुणाचे,?  चंद्रपूर जिल्ह्याला पोरगा करण्यात कोणाचे दायित्व?  या सर्व बाबींचे मंथन करण्याची गरज आज स्वयम सुधीर मुनगंटीवार यांना आहे.
 या पोरकेपणामुळे जिल्ह्याच्या विकासाला खिंडाळ  पडणार आहे.