विवेक जॉन्सन यांच्या हस्ते जागतिक दिव्यांग सोहळ्याचे व विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन



विवेक जॉन्सन यांच्या हस्ते जागतिक दिव्यांग सोहळ्याचे व विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

दिव्यांगाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहावे- धनंजय साळवे


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा परिषद च्या जिल्हा समाज कल्याण कार्यालय अंतर्गत जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्त्याने
दिनांक 4 जानेवारी 2025 ला पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंड वर आयोजित करण्यात आला.
जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा, कर्मशाळा मध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यातील 300 विद्यार्थ्यांच्या सहभाग असणार आहे. विविध क्रीडा स्पर्धांच्या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य, स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे, उपस्थितांचे मने जिंकली.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे यांच्या पुढाकारातून दिव्यांगणासाठी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माननीय गिरिष धायगुंडे मंचावर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण दिशा यंत्रणा चंद्रपूर, अतिरिक्त पोलीस निरीक्षक मा. रामटेके, डॉक्टर मंगेश गुलवाडे, पोलीस निरीक्षक किरण नवघरे यांची उपस्थिती होती.
अतिरिक्त पोलीस निरीक्षक रामटेके म्हणाले,
क्रीडा हा मानवी जीवनाचे एक मोठा आणि शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम व्हायलाच पाहिजे असतो आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासाठी आपल्या सर्वांगीण विकासासाठी हा क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत आवश्यकता असतो. यातूनच आपल्याला उत्साह ध्येय इथूनही ठरवलेलं सोपं जातं . दिव्यांगाचा उत्साह  त्यांना केलेल्या प्रोत्सानातून  पुढे येतो.
 दिव्यांग शाळेच्या शिक्षक या कार्यक्रमासाठी  तसेच विद्यार्थ्यांना  सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक गुणासाठी वाव  मिळावा यासाठी असे कार्यक्रम घेऊन मुलातील सुप्त गुण ओळखू शकतो. या ठिकाणी इथे चांगला पद्धतीने कार्यक्रम साजरा  होत आहे त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे  मनापासून  धन्यवाद देतो. असे जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी   म्हणाले. पोलीस प्रशासनाने मैदान उपलब्ध करून दिले त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद मानले.
 दिव्यांगणाला आधी विकलांग  म्हणायचे  आता दिव्यांग हाच शब्द वापरला  जावा असे  सांगितले.
आता कुठलाही परिस्थितीमध्ये विकलांग  शब्द कधीही वापरायचा नाही आणि आपण सर्व त्याबद्दल आपण दिव्याग शब्द वापरायचे . या  याबाबत केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन स्तरावर खूप महत्वपूर्ण योजना दिव्यांगणासाठी शासनाकडून मिळत आहेत.
 शासन स्तरावर दिव्यांगणासाठी 70 टक्के जागा आरक्षित असून त्यांची योग्य समीकरण असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुन्हा सोबतच कौशल्य असू शकतो.
 शिक्षकांबरोबरच   त्यांच्या पालकाची जबाबदारी आहे.
          . त्यामुळे परत मी इकडे सांगू इच्छितो की सर्व शिक्षक आणि सर्व पालक त्यांच्या जबाबदारी समजून घेतला पाहिजे. तुमच्या दिव्यांग विद्यार्थी असेल तर तो कुठला   क्षेत्रामध्ये  चांगला काम करू शकतो .कुठला  क्षेत्र मध्ये  तो त्यांच्या गुणला कौशल्या वाव देऊ शकतो .ओळखून घेण्याच्या जबाबदारी सुद्धा तुमच्यात असली पाहिजे. असे उद्घाटनिय भाषणात कार्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
 याचबरोबर क्रीडा स्पर्धेचे हिरवी झेंडी दाखवून उद्घाट उद्घाटन केले. तसेच सायंकाळी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या . सांस्कृतिक कार्यक्रमासाठी  जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय  साळवे यांनी उपस्थित राहण्याचे  आव्हान केले.
 या कार्यक्रमाचे संचालन .रविंद्र नलगंटीवार व्यवस्थापकीय अधिक्षक वरोरा, या कार्यक्रमाचे आभार   निलेश पाजारे यांनी  केले.