जगाला 'युद्ध नव्हे, तर शांती हवी' यासाठी १३८१ची मानवी साखळी करून केला विश्वविक्रम !




जगाला 'युद्ध नव्हे, तर शांती हवी' यासाठी १३८१ची मानवी साखळी करून केला विश्वविक्रम !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहराचे जागतिक शांतीसाठी विश्‍वक्र विक्रम होऊन पुन्हा एकदा नाव जागतिक स्तरावर कोरल्या गेले.
यासाठी सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन संस्थेचे चेअरमन पी. एस. आंबटकर यांनी आज दिनांक 28 /3 /2026 सकाळी दहा वाजता आपल्या संस्थेतील १३८१ विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून जागतिक विश्वविक्रम केला.
जगभरात वाढत चाललेली अस्थिरता, युद्धाची भीती आणि निरपराध लोकांचे होत असलेले हाल पाहता, "युद्ध नव्हे, तर शांती हवी" हा मानवतेचा आवाज अधिक बुलंद करण्याची आज गरज आहे. असा संदेश या मानवी साखळीतून दिला.
सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या, परिस्थितीच्या अनुषंगाने, सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स तर्फे जगातील सर्वात मोठे "जागतिक शांताता चिन्ह (World Peace Sign)" मानवी प्रतिक साकारून विश्वशांतीचा संदेश देण्याचा एक अनोखा आणि ऐतिहासिक प्रयत्न करून तो यशस्वी करण्यात यश प्राप्त झाले
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम Guinness Book च्या माध्यमातून १८० देशांमध्ये प्रक्षेपित (Telecast) केला जाणार असून, जगभरात शांततेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यापूर्वी हा विक्रम १,०७६ जणांच्या सहभागाने नोंदविण्यात आला होता. मात्र, चंद्रपूरातील या उपक्रमाने तो मोडीत काढत नवा इतिहास घडविला. चंद्रपूरच्या भूमीतून ‘युद्ध नव्हे, शांती हवी’ हा प्रभावी संदेश देण्यात आला.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. विशेष म्हणजे, याच संस्थेने १ मार्च रोजी सात मिनिटांत २० लावण्या सादर करण्याचा आणखी एक विश्वविक्रम नोंदवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या उपक्रमामुळे चंद्रपूरचे नाव जागतिक पातळीवर झळकले असून, शिक्षणासोबत सामाजिक जाणीव जोपासणाऱ्या सोमय्या ग्रूपच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पी. एस. आंबटकर यांच्या दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून उभा राहणारा हा क्षण केवळ विक्रम नसून जगाला शांततेची हाक देणारा भावनिक संदेश दिला.