चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कॅफो अतुलकुमार गायकवाड यांच्या अरेरावी व अन्याय विरोधात लेखा कर्मचारी संघटना आक्रमक !
राज्यातर व जिल्हास्तरावरिल) कर्मचारी यांचा आक्रमक पवित्रा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाले तेंव्हापासून काही ना काही कारणास्तव वादग्रस्त राहिलेले श्री अतुलकुमार गायकवाड (कॅफो) यांच्या मुस्कटदाबी व अन्याय विरोधात आता महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना पुणे (राज्यातर व जिल्हास्तरावरिल) कर्मचारी यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे.
वित्त विभागात कॅफो विराजमान झाले तेंव्हापासून वित्त विभागातील कार्यालयाच्या रूममध्ये तिसरा डोळा लाऊन कर्मचाऱ्यांची येण्या-जाण्याची व कोणता नागरिक कोणाकडे आला याची इत्यंभूत माहिती स्वतः ठेवले आहे. साधे कर्मचाऱ्यांना लघुशंखेलाही जायचे असल्यास पाच मिनिटात वापस यावे लागते. एवढी कडक नजर या तिसऱ्या डोळ्यामुळे ठेवली आहे. त्यामुळे कर्मचारी मूक बधिर झाले आहेत. कॅफो बाहेर जरी असले तरी त्यांनी आपल्या वैयक्तिक मोबाईलला कॅमेरे जोडून त्यावरून थेट कर्मचारी यांचेवर पाळत ठेवली आहे. स्वतःच्या केबिनमध्ये तिसरा डोळा लावला असता तर कर्मचारी व नागरिकांना त्यांच्या पारदर्शकते बाबत आनंद झाला असता? परंतु त्यांनी तसे न केल्याने कर्मचारीमध्ये असंतोष पसरला असुन त्यांच्या या हुकूमशाही व एकतर्फी कार्यप्रणालीबाबत शंका निर्माण केल्या जात आहे.
गायकवाड हे त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना जाणिवपूर्वक हिन दर्जाची वागणूक देऊन त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मानसिक त्रास देतात.
ज्याप्रमाणे कॅफो यांनी स्वतःचे केबिन सोडून इतर सर्व ठिकाणी फक्त लहान कर्मचारी यांचेवर CC tv कॅमेरे लाऊन त्यांना प्रेशर खाली ठेऊन धारेवर धरने.
कर्मचारी यांना मुद्दाम मागील 3 वर्षापासूनचे CR न देता त्यांचे मनात भितीचे वातावरण निर्माण करणे.
मागील 3 वर्षा पासूनचे नवीन लागलेल्या कर्मचारी यांच्या सेवा नियमित न करणे. त्यामुळे कर्मचारी यांच्या वेतनवाढ थांबल्याने त्यांना नाहक आर्थिक संकटाला सामना करावे लागत आहे. तसेच आमची सेवा नियमीत होते किंवा नाही या भीतीने कर्मचारी कमालीचे धास्तावले आहे.
फक्त 7 ते 8 दिवस किरकोळ रजेवर गेल्यास कर्मचारी यांना मेडिकल बोर्ड कडे पाठवून फिटनेस सर्टिफिकेट आनण्याकरिता नाहक त्रास देणे.
वारंवार टेबल बदली केल्यामुळे सर्व कर्मचारी भांबावून गेले असून परिणामी वित्त विभागातील कामे मोठ्याप्रमाणात खोळंबून गेले आहे.
टेबल बदलल्या नंतर कर्मचारी यांना एकमेका कडून नस्ती बाबत मार्गदर्शन व मदत घेऊ न देणे.
छोट्या- छोट्या कारणासाठी शेकडो कारणे दाखवा नोटीस देऊन कर्मचारी यांची मानसिकता खराब करणे.
कर्मचारी यांना एकमेकाच्या टेबलवर जाऊन बोलू न देणे.
काहीही कारण नसताना किंवा कोणाचीही तक्रारी नसताना मुद्दाम मागील 25 वर्षापासूनचे वित्त विभागातील संपूर्ण रेकॉर्डची चौकशी करायला लावणे.
कर्मचारी यांचे वेतनावर खोट्या शंका निर्माण करून नाहक त्यांच्या वेतनवाढ थांबऊन त्यांना नाहक आर्थिक त्रास देणे.
कर्मचारी यांनी आपल्या मागण्या सीईओ साहेब यांचे कडे मागितल्यास, कॅफो यांनी त्या कर्मचारी यांना मुद्दाम टार्गेट करून त्यांच्या संपूर्ण सेवेची व वैक्तिक नस्तीची व वैक्तिक सेवापुस्तकांची चौकशी करायला लावणे.
मागील कारकिर्दीत कर्मचारी यांनी केलेल्या टेबल वरील कामाची चौकशी करून मुद्दाम त्यांचे डि. ई. प्रस्ताव बनविणे. अशापद्धतीने त्यांना धारेवर धरून त्यांना मजबूर करून त्यांचे मनोबल कमी करून त्यांचे मनात भितीचे वातावरण निर्माण करणे.
जि.प.मध्ये इतर विभागातील कोणत्याही कर्मचारी यांचेवर CC Tv कॅमेरा लावलेले नाही. फक्त वित्त विभागात मा.सीईओ साहेब यांची पूर्वपरवानगी न घेता स्वतःचे मर्जीने कॅमेरे लावले आहे.
काही कर्मचारी यांचेवर मुद्दाम 2 ते 3 कॅमेरे लावून त्यांच्या कॅमेरा मधील हालचालींची क्लिप काढून त्यांना टार्गेट करुन धमकावत राहणे.
शासनाचे कोणतेही आदेश नसताना शासकीय सुट्टीच्या दिवशी मुद्दाम वारंवार कार्यालय ठेऊन कर्मचारी यांना धारेवर धरणे.
कार्यालयाच्या कार्यालयात (त्याच परिसरातील) इतर इमारती मध्ये वरिष्ठ अधिकारी तात्काळ बोलावल्यास त्यांच्याकडे जाण्यासाठी सुद्धा परवानगी शिवाय जाण्यास बंधन घालने.
वर्ग 2 चे अधिकारी सोडून फक्त काही वर्ग 3 चे कर्मचारी यांचे करीता AC ची सुविधा करून कर्मचारी मध्ये दीजोभाव केले आहे. त्यामुळे कर्मचारी यांचे मनात एकमेकाप्रती हिंनतेची भावना निर्माण करणे.
कॅफो 2- 2 तास कॅबिन मध्ये उभे ठेवून कर्मचारी यांची सभा घेतात. आणि सभेत जास्तीत जास्त इंग्रजी भाषेचा वापर करून वारंवार अपमानित करतात. त्यांना तुझा CR खराब करणार, तुझ्यावर डी. ई. प्रस्तावित करणार, अशी वारंवार धमकी देतात.
कर्मचारी-कर्मचारी यांना एकमेकाप्रती मुद्दाम तक्रारी करायला लाऊन त्यांच्यात वितृष्टता निर्माण करतात.
कर्मचारी यांच्या अनभिज्ञ तक्रारी करायला लावणे, आणि त्यांच्या चौकशी करून त्यांना धारेवर धरणे, तसेच चौकशीमध्ये काहीही तथ्य नसल्याचे कार्यालय प्रमुखांनी कळविल्या नंतर व नस्तिबंध केल्यानंतर सुद्धा त्या कार्यालय प्रमुखाला जॉब विचारून पुनश्च चौकशी करायला लावणे.
लेखा संघटनेनी प्रशासनाकडे आपली समस्या मांडल्यास लगेच दुसऱ्या आपल्या मर्जीतील संघटनेकडून लेखा संघटनेचीच तक्रारी करायला लावणे, या माध्यमाने कर्मचारी-कर्मचारी यांच्यात मतभेद निर्माण करून "फोडा आणि राज्य करा" असे धोरण अवलंबिले आहे.
वरील सर्व बाबी संबंधाने कॅफो वारंवार मानसिक त्रास देत असल्यामुळे बरेचसे महिला व पुरुष कर्मचारी यासोबतच तत्कालीन उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच लेखाधिकारी यांनी या बाबत वारंवार वरिष्ठांकडे व शासनाकडे तक्रारी केलेली आहे.
त्याचप्रमाणे कर्मचारी यांनी कॅफो यांच्या कार्यपद्धती व अधिनस्त कर्मचाऱ्यांशी अप्रमाणिकता त्यांचे बेजबाबदार वर्तनाबाबत, व कार्यप्रणालीमुळे लेखा कर्मचारी कमालीचे त्रासून वरील सगळ्या प्रकाराबाबत संघटनेनी मा.आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार श्री सुधाकर अडबाले , आमदार श्री देवरावदादा भोंगळे, आमदार श्री विजयभाऊ वड्डेटीवार , खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, मंत्री महोदय मा. संजयभाऊ राठोड, तसेच मा. डॉ.रिचा बागला मॅडम (प्रधान सचिव वित्त, मंत्रालय मुंबई) श्रीमती दीपा देशपांडे मॅडम (DAT) मुंबई मा.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या.
तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मा.आमदार श्री सुधाकर अडबाले साहेब यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाकडे तक्रार केली. तसेच त्यांनी कर्मचारी यांचेवर होत असलेल्या अन्याय विरुद्ध वाच्यता फोडून न्याय मिळऊन देण्याचा वारंवार प्रयत्न केला.
त्यांसोबतच कॅफो यांच्या कार्यशैलीवर वर्तमान पत्रात अनेक बातम्या प्रसिद्ध होऊन पत्रकारांनी सुद्धा अन्याय विरोधात वाच्यता फोडली आहे.
शासनाने वरील लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या गंभीर तक्रारीची दखल घेऊन कॅफो यांची प्रथमतः 2025 मध्ये नागपूर येथे बदली केली, मात्र कॅफो यांनी शासन विरोधात मॅट न्यायालयामध्ये जाऊन स्टे घेऊन चंद्रपूर येथील वित्त विभागातच काम करण्याचा हट्टाहास धरून कर्मचारी विरोधातील आपला धोरण कायम ठेवला.
त्यामुळे कर्मचारी यांनी कंटाळुन आपल्यावर होत असलेल्या अन्याय विरोधात पुनश्च शासनाकडे व लोकप्रतिनिधी कडे तक्रारी केले आणि शासनाने या सर्व तक्रारीची पुनश्च दखल घेऊन व एकाच ठिकाणी 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने कॅफो यांची 12 ऑगस्ट 2026 ला दुसऱ्यांदा मुंबई येथे बदली केली. परंतु कॅफो यांनी पुनश्च शासनाविरोधात जाऊन 14 ऑगस्ट 2026 ला दुसऱ्यांदा MAT चा स्टे आदेश प्राप्त करून घेतला. आणि ते पुन्हा चंद्रपूर च्या वित्त विभागात बस्तान मांडून मोहमायेवर ठाण बसले आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, चंद्रपूर यांनी आक्रमक पवित्रा घेत 5 सप्टेंबर रोजी सोलापूर येथील राज्य संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वांसमोर आपबिती कैफियत मांडली व सभेत एकमताने ठराव मंजूर करून कर्मचारी यांना देत असलेल्या त्रासाबाबत दखल घेण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. तसेच राज्य संघटनेने सुद्धा कर्मचारी यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत अन्याय विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदे मधील लेखा संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांनी कॅफो यांच्या गैर कृत्याचा निषेध म्हणून दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी काळी फीत लावून आपल्या नियमित कार्यालयीन कामकाजाचे पालन केले. सदर आंदोलन हे पूर्णपणे शांततापूर्ण व शिस्तबद्ध स्वरूपाचे होते. यावेळी कोणत्याही प्रकारे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आले नाही.तसेच यामाध्यमाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करून कॅफो यांचेवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अशी एकमुखी शासनाकडे मागणी केली.
कर्मचारी यांनी सद्यस्थितीत काळी फित लाऊन शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहे. शासनाने याची दखल न घेतल्यास व कॅफो यांचेवर कार्यवाही न केल्यास यापुढे लेखा कर्मचारी संघटना महाराष्ट्रभर लेखणीबंद आंदोलन करण्याची मागणी सुद्धा करण्यात येईल. अशी जिल्हा परिषद चंद्रपूर परिसरात कर्मचारी वर्गा सांगण्यात आले असले तरी आता या चर्चेला उधाण आले असून कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावनांचा आक्रोश होत आहे. यावेळी संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
