चंद्रपुरात आमदार चषक दरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 50 प्रेक्षक जखमी

ललित लांजेवार /नागपुर:

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात आमदार चषक  दरम्यान  कबड्डी सामना सुरू असताना  लोखंडी कठडा  कोसळला व 50 हून अधिक प्रेक्षक या घटनेत जखमी झाले.जखमींवर राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान घडली.  याच दरम्यान संपूर्ण परिसरातील बत्ती गुल झाली.<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/zx-RzTD4cNw" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>