बाज़ारगाव : स्थानिक विठ्ठल रुक्मिणी देवस्थान तर्फे तीन दिवसीय सपत्याचे आयोजन केले असून ११/१२/२०१८ पासून १३/१२/२०१८ पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन केले असून आज १२/१२/२०१८ ला दुपारी १२.०० वाजता पालखी सोहळा निघाला होता त्या निमिताने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमांतर्गत गावातील किल्ला, कुंभारपुरा, भोलेनगर, दिना विहार, खालचा पुरा तसेच बाजार चौक या मुख्य मार्गाने पालखी व शोभायात्रा काढण्यात आली पालखीचे स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले पालखीतील सहभागी भाविकांसाठी गावातील लोकांनी भक्तांसाठी अल्पोहर व केळीचे ठिकठिकाणी स्टोल ठेवून वितरण करण्यात आले.गांवातील महिलांनी पालखी मार्ग रस्त्यावर रांगोळ्या काढून सुशोभित केल्या होत्या,गावातील मुख्य रस्त्यावर स्वागत द्वार उभारले होते. विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण गावकरी मंत्रमुग्ध झाली होती यामध्ये परिसरातील देवळी,डिंगडोह,शिवा,सांवगा, चिंचोली, पांजरा, लिंगा, मासोद, धानोली, किनखेडा पिपला,नेरी मानकर,पेठ,सिताखैरी,देवळी पेंढरी, चांदेवणी,कवडस,धनकुंड येथील जवळपास 30 भजन मंडळ सहभागी होऊन पालखी ची शोभा वाढविली