माता महाकालीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो
मंदिर परिसरातील दुकानदारांची नाराजी, रोडशोमुळे वाहतुकीचा खोळंबा !
बिपी, शुगर कंट्रोल झाला की, शस्त्रक्रिया...!
मुख्यमंत्री शहरात रस्त्यावरची डागडुगी...!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माता महाकालीचे दर्शन घेऊन भाजपा- शिवसेना युतीतील उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शो केला. माता महाकाली पासून गांधी चौक ,जटपुरा गेट पर्यंत रोड शो करून त्यांनी रथयात्रेतूनच मतदारांना आव्हान केले. पंधरा तारखेला चंद्रपूरकरातील जनतेने आमची काळजी घ्या! 16 तारखेनंतर आम्ही तुमची काळजी घेऊ! युतीतील भाजप -शिवसेना उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान केले. चंद्रपूर विकास करायचा असेल तर देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांसाठी 50 हजारकोटी देण्याचे जाहीर केले आहेत. चंद्रपूर शहरातील पिण्याच्या पाण्याची योजना, भुयारी गटार योजना, मालकी हक्क पट्टे देण्याची योजना, सुशोभित करण्याची योजना
करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेची सत्ता भ्रष्टाचारी, दलाल, दुराचारी त्यांना दूर सारून महायुतीला मतदान करा असे मुख्यमंत्री म्हणाले.
माता महाकालीच्या मंदिरासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. त्या निधीतून माता महाकाली मंदिराच्या उपयोगात आणण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले, यावेळी त्यांच्यासोबत माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, आणि सध्या अपघात ग्रस्त असलेले आमदार देवराव भोंगळे यांनी महाकाली मंदिरातच आपली उपस्थिती दर्शविली.
मुख्यमंत्री चंद्रपूर महाकाली मंदिरात येणार असल्यामुळे या परिसरातील फूटपाटवर व आतमधील असलेल्या दुकानदारांना मुख्यमंत्र्याच्या दौरामुळे आपली दुकाने सकाळपासूनच दुपारपर्यंत बंद ठेवल्यामुळे तर काहींना हटवावे लागले. आणि रविवार असल्यामुळे मंदिरासाठी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुख्यमंत्री जाईपर्यंत दर्शन घेता आले नाही. त्यामुळे येथील दुकानदार व भाविकांनी नाराजी व्यक्त केली. शहरात रोड शो असल्यामुळे वाहतुकीला कोळंबा झाल्याचे पाहण्यास मिळाले.
कोणत्याही नेत्यात गटबाजी नसल्याचे, दोन्ही नेते आमचेच नेते आहेत, एकत्र आहेत चंद्रपूर शहराच्या विकासासाठी सगळ्यांचेच योगदान आहे. चंद्रपूर शहराला पालकमंत्री न देण्याच्या कारणावर ते बोलत असताना म्हणाले युतीच्या राजकारणाबाबत 20 मंत्रीपद बाहेर द्यावी लागलेत. कोणालातरी समाधान करावे लागेल चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारावर होणाऱ्या अन्यायावर पालकमंत्री पदाच्या विषयाला बगल दिल्याचे मुख्यमंत्र्याकडून दिसत आले.
सध्या चंद्रपूर शहरात भाजप या राजकीय पक्षाकडून पक्षांतर्गत कुरघुडीचे राजकारण सुरू असल्याचे शहरात चांगलेच राजकारण तापले आहेत. भाजपकडून तिकीट वाटप संदर्भात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे, तर वरिष्ठाकडून आलेल्या यादीवर काटकुट करून मन मर्जीतले उमेदवार दिल्याचे वादळ सध्या चंद्रपूर शहरात वाहत असताना. या विषयावर मात्र चंद्रपूर शहरात रोड शोसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कुठलेही भाष्य केले नसल्याचे दिसून आले.
मात्र दोन दिवसांपूर्वीच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी
१६ जानेवारीनंतर शस्त्रक्रिया असे म्हणत, पुढीलकारवाईचे संदेश दिले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कितीही सारवासावर करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना, अधिकृत यादी बदलण्याप्रकरणी येत्या काळात कारवाई निश्चित होईल, असे संकेत दिले. ते म्हणाले, "एकवा १६ जानेवारीनंतर बिपी, शुगर कंट्रोल झाला की, यासंदर्भात जेव्हा शस्त्रक्रिया सुरू होईल, तेव्हा याबाबतची माहिती मला देता येईल. 'एबी फॉर्म'ची चोरी झाली ती काही प्रदेशाच्या कमिटी सदस्यांकडून झालेली नाही आणि अशी तक्रार प्रभारी अशोक नेते व निरीक्षक चैनसुख संचेती यांनी भाजपा प्रदेश कार्यालयाकडे केली आहे. याठिकाणी ज्या पद्धतीने 'एबी फॉर्म'च्या संदर्भामध्ये कृती केली गेली, ती नेते व संचेती या दोघांनाही मान्य नाही. अशोक नेते यांनी तर राजीनामाही पाठविला होता. ज्या पद्धतीने हे बदल झालेत, त्यामध्ये इतरांचा काहीही दोष नव्हता, एबी फॉर्म भरणाऱ्यांनीही याबद्दलची माहिती दिली आहे, असे सुतोवाच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
चंद्रपूर शहरातील बाराही महिने खड्ड्यात असलेल्या शहराला अचानक मुख्यमंत्री शहरात येत असल्याने रातोरात मुख्य रस्त्यावरील गड्ड्यावर डांबर टाकून खड्डे बुजवल्या गेले. एरवी बारावी महिने चंद्रपूरकरांचे कंबरडे तोडणारे गड्डे का दिसत नाहीत. हा प्रश्न चंद्रपूरकर निवडणुकीत लोकप्रतिनिधींना विचारतील का?
