धक्कादायक:फुगा फुगवतांना ६ वर्षीय बालकाचा मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी:

नागपुरात एका ६ वर्षीय बालकाचा जीव हा एका फुग्याने घेतला असल्याची धक्कादायक घटना घडली.
सानिध्य आनंद उरकुडे ६ वर्षे असे या घटनेत मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. सानिध्य उरकुडे हा सहा वर्षीय मुलगा घराच्या आवारात फुग्यांनी खेळत होता. 25 जानेवारीला त्याने तीन फुगे खरेदी केली. दोन फुगे आईने फुगवून दिले. तर तिसरा फुगा संध्याकाळी स्वतः फुगवण्याचा प्रयत्न सानिध्य करत होता,फुगा फुगला पण तो फुटला मात्र फुग्यापासून आणखी छोटा फुगा म्हणजेच चीटूकली बनविण्याचा प्रयत्नात त्याने श्वास जोरात आत घेतला व तोंडातला फुगा घशात गेला, आणि श्वासनलिकेत अडकला,त्यामुळे तो तडफडायला लागला. त्याला बोलता येत नसल्याने त्याच्या आईला पाणी पाजले. त्यामुळे फुगा अन्ननलिकेत फसला.

  तत्काळ शेजारयाच्या मदतीने सानीध्याला मेयो रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या घटनेमुळे आता लहान मुलं काय खातात, ते कोणत्या वस्तू तोंडात घालतात, याकडे पालकांनी डोळ्यात तेल घालुन काळजी घेण्याची गरज आहे.