चंद्रपूर चिचपल्लीत दोन एसटी बस मध्ये जोरदार अपघात




चंद्रपूर चिचपल्लीत दोन एसटी बस मध्ये जोरदार अपघात

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर कडून मूल कडे जाणाऱ्या चंद्रपूर आगारातील बस व गडचिरोली कडून चंद्रपूर कडे येणाऱ्या गडचिरोली आगारातील बस मध्ये चिचपल्ली येथे ग्रामीण हॉस्पिटलच्या समोर जोरदार अपघात झाल्याने बसचा समोरचा भाग शतिक ग्रस्त झाला आहे. तर दोन्ही मधील ड्रायव्हर कंडक्टर ना मार लागल्याने प्राथमिक उपचार चिचपल्ली आरोग्य सेवा करून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. बस मध्ये असलेले दोन्ही बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. असून त्यांना प्राथमिक उपचार चिचपल्ली येथे रुग्णालयात करण्यात आला. पुढील तपास रामनगर पोलीस अंतर्गत येत असलेल्या चिचपल्ली पोलीस चौकीचे पोलीस करीत आहेत.