ग्रा.पं.कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

नागपूर / अरूण कराळे:

नागपूर तालुक्यातील पिपळा (घोगली) ग्राम पंचायत मधील कर्मचारी सूरेश गोवींदराव बागडे यांना मंगळवार २२ जानेवारी रोजी सायकाळी ४ .३० वाजता पीपळा रस्त्यावर अज्ञान चार तरुणांनी मारहान केली .सूरेश बागडे हे ग्राम पंचायतीच्या कामानिमीत्य नागपूर वरून परत येत असतांना चार तरूणांनी पकडून पैशाची मागणी केली त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामूळे राॅडने बेदम मारहान केल्याचे बागडे यांनी सांगीतले.
 पिपळ्याचे सरपंच नरेश भोयर , उपसरपंच प्रभाकर भेंडे, ग्रा.प.सदस्य प्रकाश भोयर म.रा.ग्रा.प.कर्मचारी यूनियनचे नागपूर तालूका सचिव सचिन राऊत व कार्याध्यक्ष गोपाल तकीत , दिलीप लेंडे यांनी सूरेश बागडे यांना उपचाराकरीता सेंटर पाइंट हाॅस्टिल येथे भरती करून हुडकेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली व आरोपीला त्वरीत अटक करण्याची मागणी केली .

Attachments area