शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू;तिघांना अटक

भंडारा/प्रतिनधी: 

भंडारा जिल्ह्यातील कोंडा कोसरा येथील शिक्षकाचा संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून लवकरच या प्रकरणाचे रहस्य उलगडणार आहे. शिक्षक लीलाधर घाटे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत त्यांच्या शेतातील पाण्याच्या डबक्यात मंगळवारी आढळला होता.त्यानंतर तालुक्यात या घटनेला चांगलेच उधान आले होते. दरम्यान या शिक्षकाची दोन मुले पोलिसांनी ताब्यात घेतले सोबतच आणखी एका व्यक्तीला ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याची दिवसभर चौकशी करण्यात आली याबाबत पोलिसांना विचारणा केली असता सदर चौकशी सुरू असल्याचे सांगितले. अधिक तपास उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरु आहे.