चिमूर नगरपरिषेदेत पंतप्रधान घरकूल आवास योजना राबविण्यात मुख्याधिकारी उदासीन

चिमूर /रोहित रामटेके:

शासनाने पंतप्रधान घरकुल आवास योजना ही जनसामान्याच्या गरिबांच्या विकासाकरिता अमलात आणली व नगर परिषद चीमुर यांनी पंतप्रधान घरकुल आवास योजना नगरपरिषद क्षेत्रात करिता दिनांक 11 -6 -2018 ला सॉंग सिस्टीम द्वारे जनजागृती करण्यात आली होती.
 त्यानंतर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी पंतप्रधान घरकुलाची माहिती होतात नगरपरिषद कडून 2193 लाभार्थ्यांना अर्जाचे वाटप ही करण्यात आले होते त्यापैकी 939 लाभार्थ्यांनी सदर अर्ज भरून न प दिले त्यादरम्यान नगरपरिषदेने पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे अर्ज माहे ऑगस्ट 2018 पर्यंत सादर करण्याची तोडी सूचनाही लाभार्थ्यांना दिली मुख्याधिकारी यांना वारंवार पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे वाटप केव्हा होणार लाभार्थ्याकडून आवश्यकतेनुसार कागदपत्रे जमा करून सुद्धा अजून पर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला नाही असे तोंडी विचारले असता त्यावर मुख्याधिकारी म्हणाले डीपीआर तयार करण्यासाठी एखाद्या एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे परंतु अजून पर्यंत डीपीआर तयार करण्यात आला नाही या योजनेची सुरुवात जून 2018 पासून सुुरू होऊन ही जानेवारी 2019 आले असता.

 सदर योजनेअंतर्गत कोणतेही अमलबजावणी झाली नाही त्यानंतर मी दिनांक 3-10-2018 व दिनांक 1-12-2018ला चीमुर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केल्यावरही अजून पर्यंत पत्रव्यवहाराची दखल मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेली नाही यामुळे मुख्य अधिकारी हेच योजनेचे जबाबदार आहेत मुख्य अधिकाऱ्यांनी कर्तव्यात तत्परता दाखवली असता तर आज सदर योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळाला असता परंतु नगर परिषद कार्यालयाच्या उदासीन धोरणामुळे पंतप्रधान घरकुल आवास योजना राबविणे गेले नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल ही योजना एक महिन्यात अमलबजावणी झाली नाही तर घरकुल लाभार्थ्यांसह उपोषनाला बसणार असा इशारा चिमुर नगर परिषदेचे बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे