धक्कादायक:चंद्रपुरात जनावरांची तस्करी करणार्‍या ट्रकने पोलिसाला चिरडले


ललित लांजेवार:
चंद्रपुरात अवैध जनावरांची तस्करी करणाऱ्या ट्रकने पोलिस कर्मचाऱ्यांवर थेट ट्रक चढवून चिरडल्याची  धक्कादायक घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. प्रकाश मेश्राम असे या अपघातात शाहिद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
 पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून खांबाळा चेक पोस्टवर पोलिसांनी जनावरांची तस्करी करणाऱ्या  ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव ट्रकने ट्रक न थांबता थेट पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातला. यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून वाहन क्रं. MH.49.0614
हा ट्रक नागपूरच्या  कामठी येथील असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी इम्तियाज अहमद फैय्याज (१९), मोहम्मद रजा अबुल जब्बार कुरेशी (१९) दोघेही नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून अटक केली. गेल्या काही दिवसांपूर्वी नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी छत्रपती चिडे यांना अवैधरित्या दारू वाहून नेणाऱ्या स्कार्पियोने धडक दिली होती. या धडकेत छत्रपती चिडे यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपुर जिल्हयात दारुबंदी असल्याने अवैध दारुचा पुरवठा रोखण्यासाठी विशेष अभियान सुरु करण्यात आलेल्या चेक पोस्टवर  ही धक्कादायक घटना घडली .परत याच घटनेशी साम्य असलेल्या प्रकार घडल्याने चंद्रपूर पोलिसात चांगलीच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ.महेश रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असून मृतदेह शवविच्छेदना करीता वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.