भाजपाच्या जागरूक लोकप्रतिनिधीमुळे ग्रामीण क्षेत्राचा विकास :खुशाल बोंडे

गोवरी /प्रतिनिधी:
 खेड्यांचा विकास व्हावा, शेतकरी व कष्टक-याचे जीवन सुखी व समृध्द व्हावे हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर लोकप्रतिनिधीचे कर्तव्य बजावत आहे. शेतक-यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शेतीपुरक व्यवसायाची शेतक-यांनी कास धरावी यासाठी ते झटत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या ग्रामीण विकासाला उपकारक ठरणा-या योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते आग्रही आहेत. अशा लोकाभिमुख, विकासाभिमुख लोकप्रतिनिधीमुळेच खेडी विकासाने समृध्द होत असल्याची भावना जिल्हा दखता व सनियंत्रण समितीचे सदस्य खुशाल बोंडे यांनी व्यक्त केली. 
गोवरी येथील खासदार स्थानिक विकास निधी द्वारे प्रस्तावित खुल्या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच त्यांच्या शुभहस्ते पार पडले त्या प्रसंगी ते बोलत होते. सभागृह हे वैचारिक क्रांतीचे, बंधुभावाचे विचारपीठ ठरावे असे सांगत खुशाल बोंडे यांनी भाजपाच्या शासनकाळात ग्रामीण विकासाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना राबविण्यात आल्याने रस्ते, सिंचन, घरकुल व वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा लाभ सर्व समुदायातील लोकांना मिळत असल्याचे सांगितले. 
शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारा एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून मोठया आस्थेने ना. अहीरांकडे लोक बघतात, हे त्यांच्या कामाची पावती आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी जि.प. सदस्य सुनिल उरकुडे जि.प. सभापती सौ. गोदावरी केंद्रे, भाजपा किसान आघाडी महासचिव राजु घरोटे, आदिवासी नेते, वाघुजी गेडाम, जिवती तालुका भाजपाध्यक्ष केशव गीरमाजी, सुरेश केंद्रे, सरपंच सौ. उरकुडे, नथ्थुजी ढवस व गोवरी येथील नागरिकांची बहुसंख्येनी उपस्थिती होती.