विकास कामांचे नारळ फोडले पण विकास कुठे दिसला नाही:आ.बाळासाहेब पाटील

पुसेसावळी (प्रतिनिधी) :

आता काही दिवसात इलेक्शनचे वारे वाहिल आणि काहीजण येथील त्याच्या भुलथापांना बळी पडु नका, 
मागील निवडणुकीत दिडशे कोटीचा डंका करणार्‍यांनी विकास कामांचे नारळ फोडले पण विकास कुठे दिसला नाही याची कल्पना सगळ्यांन‍ा आहे, अशी टिका आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली.ते मुसांडवाडी (ता.खटाव) येथे गणी भाई चाैक नामंकर सोहळा व विविध विकासकामांचे भुमिपुजन कार्यक्रमात बोलत होेते.
यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड,माजी पंचायत समिती सभापती संदिप मांडवे,मार्केट कमिटीचे माजी सभापती सी.एम.पाटील, वडगावचे सरपंच संतोष घार्गे, व्हा.चेअरमन विलास शिंदे,महादेव माने,चेअरमन राजेंद्र माने,भिकाजी कटे,सुरेश घाडगे,अधिकराव माने आदीची प्रमुख उपस्थित होती.

आ.पाटील म्हणाले या परिसरातील वाडीवस्तींना लागणार्‍या कामांसाठी येणार्‍या काळामध्ये भरिव निधीची तरतुद केली जाईल, त्याचबरोबर या गावामध्येही आजपर्यंत लाखो रुपयांची कामे केली आहेत.
या भागातुन जात असलेल्या उरमोडीच्या पोटपाटाचे काम लवकरच मार्गी लागेल तसेच आज गावामध्ये गणी भाईच्या नावाने चाैकास नामंकर केल्यामुळे त्यांच्या स्मृती जागृत राहणार आहेत.

तद्नंतर समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड म्हणाले की या मतदारसंघामधील प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून कामे झालेली आहेत,त्यामुळे आपणही त्याच्या मागे खंबीरपणाने उभे राहिले पाहिजे, त्याचप्रमाणे या विभागातुन घरकुल,घरगंटी,पिठाची चक्की सारखे वैयक्तिक लाभ ही या विभागातुन गावामध्ये केलेले आहेत,

यावेळी सुरज शेख, जैनुद्दीन पटेल, जलाऊद्दिन पटेल सलमान पटेल, उसमान शेख, रामहरी मोरे, किसन इंगळे राजेंद्र इंगळे, चाॅद पटेल, तुषार मोरे, शहाआलम पटेल अरमान पटेल,रियाज पटेल, संजय मोरे, पै.अक्षय घाडगे,हणमंत मोरे,सुनिल इंगळे,संतोष मोरे,संकेत मोरे आदी ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते.
प्रास्ताविक खुदबुद्दीन पटेल यांनी केले,तर आभार उपसरपंच आसिफ मुलाणी यांनी मानले