दारु विक्री करणाय्रा पोलिस उपनिरिक्षकाला सहआरोपी करा

दारुबंदी जिल्ह्यातील प्रकार

नागपूर खंडपिठात याचिका दाखल

 नागपूर, प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने दारुबंदी केलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पकडलेली दारु विक्री व वाहतुक केल्याबाबत गडचिरोली पोलीस अधिक्षक यांच्या चौकशीतुन दोषी ठरल्याने केवळ दोन वर्ष वेतन वाढ स्थगीतीची दिलेली शिक्षा फारच कमी असल्याने देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ६१२५/२०१६ मध्ये  तपासी अधिकारी म्हणुन असलेल्या पोलीस उप निरिक्षक सुहैल पठाणला सह आरोपी करण्यात यावे याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात ३१ जानेवारी ला रिट याचिका दाखल झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.

           पोलीस स्टेशन देसाईगंज येथिल अपराध क्रमांक ६१२५/२०१६ कलम ६५(अ), ९८(क), ८३ मुंबई दारु कायदा अंतर्गत गुन्हयात पोलीस उप निरिक्षक सुहैल पठाण यांनी घटनास्थळावरुन १०० दारु च्या पेट्या ताब्यात घेऊन त्यापैकी ४० पेट्या गुन्हयामध्ये जप्त दाखवुन ६० पेट्या दारु मौजा देसाईगंज येथिल अवैद्य दारु विक्रते अनिल गेडाम यांना ४० पेट्या दारु व गुरुबच्चन मक्कड यांना २० पेट्या दारु पोलीस स्टेशन च्या जिप्सीमध्ये पोहचता केले असल्याचे चौकशीतुन स्पष्ट झाले होते.

               गडचिरोली जिल्हा सन १९९२ पासुन दारुबंदी जिल्हा म्हणुन घोषित करण्यात आलेला असुन ही बाब माहित असतांना सुद्धा कोणत्याही प्रकारची दारु विक्री,वाहतुक होणार नाही याकडे पोलीस विभागाने विशेष लक्ष देऊन प्रभावी कारवाई करणे अपेक्षित असतांना संगणमत करुन पकडलेली दारु विक्री करुन पोलीस विभागात कार्यरत असतांना लांछणास्पद व पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करणारे व पदास न शोभणारे वर्तन केले असल्याचे डॉ अभिनव देशमुख,पोलीस अधिक्षक,गडचिरोली यांनी ४ ऑक्टोंबर २०१७ ला मुंबई पोलीस शिक्षा व अपिले १९५६ च्या कलम ३(२)(५) चे तरतुदीनुसार पोलीस उप निरिक्षक सुहैल पठाण यांची पुढील देय होणारी वार्षिक वेतन वाढ दोन वर्ष स्थगीत करण्याची शिक्षा दिली होती.

            मात्र, सदर शिक्षा फारच कमी असुन दारुबंदी गडचिरोली जिल्ह्यात रक्षकच भक्षक झाल्याने पोलीस उप निरिक्षक सुहैल पठाण याला देसाईगंजच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या अपराध क्रमांक ६१२५/२०१६ मध्ये सह-आरोपी करण्यात यावे,यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात देसाईगंज येथिल सामाजिक कार्यकर्ते आकाश अग्रवाल यांनी़ याचिका क्रमांक डब्ल्युपी /१०४/२०१९ अन्वये सिआरपीसी २२६ अंतर्गत भादंवि ६५(अ,)९८(क),८३ मुंबई दारु कायद्यांतर्गत 

दि.३१/१/२०१९ ला दाखल केले असुन यांवर ७ फेब्रुवारी २०१९ ला सुनावणी ठेवण्यात आली असल्याने एकच खळबळ माजली आहे.


*आपले सरकार"वर केली होती याचिकाकर्त्यानी तक्रार*


गड़चिरोली पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली यांना आपले सरकार या पोर्टल वर दारुबंदी गडचिरोली जिल्ह्यात पकडलेली अवैद्य दारू परस्पर विक्री व वाहतुक प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सोहेल पठाणवर दि ७ जुलै ला २०१७ व दि. २५ जुलै २०१७ ला प्रसार माध्यमांच्या प्रकाशित बातम्यांचा संदर्भ देत कायदेशीर कारवाई करून निलंबित करुन सहआरोपी करण्यात यावे,अशी विनंती देसाईगंज येथील गांधीवार्डातील सामाजिक कार्यकर्ता आकाश अग्रवाल यांनी दि २७ जुलै २०१७ ला केली होती. या तक्रारीचा टोकन नंबर Dist /PLGD /2017/31 प्राप्त झालेला होता. या गंभीर प्रकरणाची चौकशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे होती. तक्रारदार आकाश अग्रवाल यांचा जबाब १८ आगष्ट २०१७ ला रीतसर पत्र देऊन जबाब नोंदवले होते हे येथे उल्लेखनिय.