भगवान परशुरामाची मंगळवारी भव्य शोभा यात्रा.



बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे आयोजन               
 
येथील अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण समाजच्या वतीने मंगळवारी ( ७एप्रिल) ला भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती ब्राह्मण समाजाचे शिर्षस्थ ऍड सुनील पुराणकर,सत्यनारायण तिवारी,युवा मार्गदर्शक अनुपम दीक्षित यांनी दिली आहे.                        
 गेल्या कित्येक वर्षा पासून भगवान परशुरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यात सर्व प्रांतीय बहुभाषिक ब्राह्मण बंधू व भगिनी सहभागी होतात.यंदाही भगवान परशुरामाची शोभायात्रा   सायंकाळी ५ च्या सुमारास लक्ष्मी नारायण मंदिरातून निघणार असून, ती जटपुरा गेट,कस्तुरबा रोड मार्गे गांधी चौक होऊन लक्ष्मी नारायण मंदिरात विसावणार आहे.मंदिरात भगवान परशुरामाचे पूजन व आराधना आटोपल्यावर समाजबांधव कुटुंबीयांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे .अशी माहिती दीक्षित यांनी दिली. शोभयात्रे च्या यशस्वीतेसाठी विनोद उपाध्याय,दतप्रसंन्न महादाणी, संकेत मिश्रा,रवी दीक्षित,दीपक व्यास,प्रतीक तिवारी,पूनम तिवारी,मंगेश देशमुख,प्रशांत विघ्नेश्वर आदि परिश्रम घेत असून समाज बांधवांनी कुटुंबासह सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण समाज च्या वतीने चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभा,बहुभाषिक ब्राह्मण संघ आणि समस्त ब्राह्मणवृंद चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.