आमदार गेले भूमिपूजनाला , स्नेह मिलन करून परतले !



आमदार गेले भूमिपूजनाला , स्नेह मिलन करून परतले !

आमदाराची समय सूचकता शुभेच्छा देत परतले

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील तुकूम प्रभागातील द्वारकानगरी येथे भूमिपूजन सोहळ्या आयोजित करण्यात आला होता
या सोहळ्यास नागरिकांनी चांगला विरोध केला. आमदार किशोर जोरगेवार यांना भूमिपूजन न करता परतावे लागले. अखेर या भूमिपूजनाच्या सोहळ्याला स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात रूपांतर करावे लागले. यात आमदाराची स्वयं सुचकता फार महत्वाची राहिली.
चंद्रपूर भाजपा महानगरचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांच्या भूमिपूजन समारंभास नागरिकांचा कडाडून विरोध करण्यात आला.
भूमिपूजन कार्यक्रमाच्या निषेधाचे बॅनर हाती घेत द्वारका नगरीचे नागरिक एकवटले. वॉर्डातील नाल्याची पुराचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याचे बांधकाम आधी करा द्वारका नगरी वासियांची मागणी रेटून धरली . मात्र आमदाराच्या मध्यस्थीने तणाव निवडला व दिवाळीच्या शुभेच्छा देत आमदार जोगेवार परतले .
पुराचे पाणी वाहून नेणारा नाला आणि भूमिगत नाल्यांचे बांधकाम एकाच वेळी सुरू करू आमदारांनी दिले आश्वासन.भूमिपूजन कार्यक्रम रद्द करत स्नेह मिलन कार्यक्रमातून आमदारांनी साधला नागरिकांशी संवाद साधावा लागला.
चंद्रपूर मधील तुकुम प्रभाग क्रमांक एक मध्ये द्वारका नगरी येथील 1 . 33 कोटी रुपयांच्या भूमिगत नाल्यांच्या बांधकामासाठी आमदारांनी निधी उपलब्ध करून दिला.
या औचित्ताने प्रभागातील माजी नगरसेवक तथा सध्या भाजपाचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष म्हणून परिचित असलेल्या सुभाष कासनगोट्टूवार यांनी भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
द्वारका नगरी वासियांनी मात्र या कार्यक्रमाला विरोध करत भूमिगत नाल्या केल्यास पुराचा फटका वाढेल त्यामुळे आधी पुराचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याचे बांधकाम हाती घेणे आवश्यक असल्याची स्पष्ट भूमिका आमदारांसमोर मांडली. आमदार किशोर जोरगेवार यांनी द्वारका नगरी वासियांचा मुद्दा ऐकून घेत येत्या चार दिवसात या संदर्भात जिल्हाधिकारी महाजनको यांच्यासोबत बैठक लावून पुराचे पाणी वाहून देणाऱ्या नाल्याचे काम आधी हाती घेऊ असे आश्वासन दिले.त्यानंतर मात्र भूमिपूजन कार्यक्रम रद्द करत त्याच ठिकाणी दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रम घेत आमदारांनी नागरिकांशी संवाद साधला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या समय सुचकतेची चांगलीच चर्चा होत आहे.