सामाजिक निर्व्यसनी संस्था च्या वर्धापनदिन निमित्तय, निर्व्यसनी घटकांना पुरस्काराचे आयोजन.

 सामाजिक निर्व्यसनी संस्था च्या  वर्धापनदिन निमित्तय,  निर्व्यसनी घटकांना  पुरस्काराचे आयोजन.
चंद्रपूर-  
 सामाजिक निर्व्यसनी  संस्थांचा  दिनांक आठ जुलै  2019 रोजी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त निर्व्यसनी स्त्री-पुरुष यांना पुरस्कृत करणार आहेत .  समाजातील निर्व्यसनी घटकांनि  संस्थेशी शनिवार दिनांक  सहा जुलै 2019 पूर्वी छापील कर्जासाठी संपर्क साधावा व समाजाला विषमुक्त करण्याच्या संस्थेच्या ध्येय-  धोरणाला हात  भार लावावा.
मागील पंधरा वर्षापासून सामाजिक निर्व्यसनी संस्था चंद्रपूर जिल्ह्यत समाजातील  व्यसनी  स्त्री-पुरुष,  मुले- मुलींना  जागरुक करण्याचे सामाजिक कार्य करीत आहे.  या समाजकार्याला संस्थेला पंधरा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे 8 जुलै 2019 रोजी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील निर्व्यसनी स्त्री- पुरुष, मुले- मुली, यांना माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात गौरवान्विंत  करण्यात येणार आहे.  समाजामधील मध्य पान,  धूम्रपान,  बीड- सिगारेट,  तंबाखूतंबाखू,  गुटका,     खररा,  बिअर, दारू  चरस,  गांजा, भांग, चुट्टा,  सिंगार  अशा मादक पदार्थाचे सेवन न  करणाऱ्या निर्व्यसनी घटकांना या वर्धापन दिनी करून त्यांना प्रोत्साहित केल्या जाणार आहे.  यावर्षीपासून दर वर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त निर्व्यसनी घटकांना पुरस्कृत करून समाजाला वेसन मुक्त करण्याचा  संस्थेचा मानस आहे.  या पुरस्कारासाठी येणाऱ्या अर्जांचा विचार करून पत्र देऊन पुरस्कार  पुरस्कर्त्यांचा मान्यवराच्या उपस्थित सत्कार करण्यात येणार असून  यातील एका निर्व्यसनी व्यक्तीला ईश्वरचिट्टी  काढून 15000  रोख रक्कम पुरस्कार स्वरूपात व प्रमाणपत्र दिल्या जाणार आहेत.  त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वेसन मुक्त झालेल्यांनी आपला सहभाग  दर्शवावा.  यासाठी सामाजिक निर्व्यसनी संस्था केराप उत्तम बनसोड माता नगर चौक  भिवापुरवार्ड,  लालपेठ,  या पत्त्यावर पाठवावा.  तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी    0७१७२ - २२६९५३  , ७८७५०८७८९९  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान संस्थेच्या उपाध्यक्ष सौ नंदाताई  बनसोड, सौ.  कविता   निब्रड,  सौ राजश्री झाडे,  सौ. ओमीता झाडे,  सौ.  विशाखा  हुमने.  यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये निर्व्यसनी घटकांना आव्हान केले आहे.