माना रोड–इरई नदी परिसरात वाघाने वासराला ठार करून गायीला जखमी केले
अमोल शेंडे यांच्या पुढाकाराने वनविभागाकडून तात्काळ कारवाई..
दिनचर्या :-
चंद्रपूर :-
माना रोड येथील इरई नदी परिसरात वाघाने गाईच्या बछड्यावर हल्ला करून त्यास ठार केले असून गाईला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती भिवापूर वाड्यातील रहिवासी राजू गजर यांच्या मालकीची वासरू व गाय होती.यांनी अमोल शेंडे यांना दिली.माहिती मिळताच अमोल शेंडे यांनी तात्काळ वनविभागाचे आरएफओ श्री. नायगमकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार वनरक्षक प्रदीप कोडापे व वनमजूर जलील शेख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. सदर प्रकरण मदती व नुसकान भरपाईसाठी शासनाकडे पाठवण्यात आले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात वाघाचा संचार असल्याचे निष्पन्न केल्याचे सांगत, पंचनाम्यानंतर बाधित पशुधनधारकास तात्काळ भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमोल शेंडे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. या परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणे सकाळी फिरण्यासाठी निघतात. त्या
नागरिकांनी एकटे फिरणे टाळावे, विशेषतः पहाटे व सायंकाळच्या वेळी बाहेर जाणे टाळावे. आवश्यक असल्यास किमान चार ते पाच जणांनी एकत्र फिरावे व सोबत काठी बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग व प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा निर्धार अमोल शेंडे यांनी व्यक्त केला आहे.
