चंद्रपूर - साईबाबा बिगर शेतकरी सहकारी पतसंस्था आवाळपूर येथील संचालक मंडळावर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवडल्या. त्यांच्यावर गडचांदूर येथे अप क्र. २८३/२०१९कलम ४०६, ४०९,४२०, ३४,भा.द.वि.सहकलम एम. पीआय.डी अॅक्ट 1999 अन्वये आरोपी नामे अध्यक्ष विठ्ठल डाहुले, सचिन पेचे, महादेव अवताडे, व इतर सात सदस्य कार्यालय व्यवस्थापक अविनाश चौधरी, विकास डाहुले त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला त्यांना अटक करून सात दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली. दीड ते दोन वर्षापासून गुंतवणूकदाराच्या फसवणूकी होऊन तीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले.
तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत 188 केसेस करण्यात आल्या असून यामध्ये 36 हजार सहाशे रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हय़ात तंबाखू व सिक्रेट प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना व मार्गदर्शन शाळा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखू जन्य पदार्थ प्रतिबंधक खडक करण्याचे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
एम पी डी ए कायद्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत दहा केसेस झाल्या असून ज्या व्यक्तींना समाजात राहणे धोकादायक असते त्यांचे विरुद्ध कारवाई करून सुद्धा त्यांचे कृतज्ञ बदल होत नाही अशा गुन्हेगारांविरुद्ध एम पी डी ए काय द्यावे कारवाई केली गेली. यात आरोपी नामे विष्णू घनश्याम कंजर, खंजर मोहला याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्याला अटक करून जेल मध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी असताना जिल्ह्यात दारू पुरवठा करणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांना परवाना रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नागपूर येथील मेहुल अडवणी यांचे दारू दुकानाचा परवाना रद्द करण्यात आल्याचा आदेश पारित झाला.
दारूबंदी प्रभावी कारवाई करीत पोलिसांनी दत्तक गाव मोहल्ला योजना संपूर्ण दारुबंदी घोषित जिल्ह्यात करण्यात येणार आहे. असे गाव किंवा तो मोहल्ला दारू मुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात दत्तक गाव, मोहल्ला ही मोहीम यशस्वी करण्याकरिता त्यांचे स्तरावर कारवाई बैठका तसेच इतर उपाययोजना करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.