महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : ना. मुनगंटीवार




महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : ना. मुनगंटीवार

v मूल येथे सामाजिक सभागृह उभारणार

v महात्मा ज्योतीबा फुले चौकाचे सौंदर्यीकरण करणार

v परिसरात बॅरेजची श्रृंखला निर्माण करणार

v मुलच्या कृषी विद्यापीठाला मत्स्यदुग्ध व्यवसायाची जोड देणार

चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर : पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा नामविस्तार करण्यासाठी जी सांसदीय लढाई मी लढली. त्याच पद्धतीने राज्यकेंद्र ज्या ज्या व्यासपिठावर शक्य आहे त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावेयासाठी प्रयत्न करेलअसे प्रतिपादन राज्याचे वित्तनियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटवार यांनी मूल येथील मेळाव्यामध्ये दिले.

मूल येथे आयोजित एका सामाजिक मेळाव्यामध्ये आज ते संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तिकेचे देखील विमोचन केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वारसांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देणेस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणेपुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे नाव देण्यासाठी केलेले प्रयत्नया लढया संदर्भातील त्यांच्या विधिमंडळातील कामकाजावर आधारित पुस्तकाचे देखील आज प्रकाशन झाले. माळी समाज बांधवांच्या भव्य मेळाव्याला ते संबोधित करीत होते.

महाराष्ट्रातील थोर पुरुषांच्या महात्म्याला जनतेपुढे आणण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी विरोधी पक्षात असताना पासूनचा आपला संघर्ष देखील कायम आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करताना आपली भूमिका निश्चित होती. ज्या भूमिकेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्व समाजाच्या लोकांना शिक्षित करण्यासाठी संघर्ष केला. त्यांचे अंतिम ध्येय लक्षात घेऊन समाजाने विचार करावा. सब जाती समान हैया मानवतेच्या मंत्राला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात बळ दिले आहे. त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाईचा वारसा प्रत्येक मुलींनी चालवावाअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ज्या महामानवाने शिक्षणाचा मंत्र आमच्या हाती दिला. मजबूत समाजव्यवस्था घडविण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता समाजाला पटवून दिली. त्यांच्या वंशजाला न्याय देणे हे माझे कर्तव्य होते. त्यासाठी आपण प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .

   यासोबतच त्यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करण्यासाठी आपले प्रयत्न आणखीन वाढविण्यात येईलअसे स्पष्ट केले.

आज पर्यंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात उचललेल्या प्रत्येक विधायक कार्याला आपल्याला यश आले असून राज्य व केंद्र शासन स्तरावर हा प्रश्न निकाली लावू असे आश्वस्त उद्गार त्यांनी यावेळी काढले.

मूल याठिकाणी माळी समाजाचे सभागृह निर्माण करण्याबाबत मागणी या मेळाव्यात करण्यात आली होती. त्याला देखील त्यांनी यावेळी मंजुरी दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात आलेल्या मुल येथील चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षात या परिसरात केलेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी सादर केला. ते म्हणाले कीहा जिल्हा महाराष्ट्रातला सर्वाधिक पाणीदार जिल्हा बनावा यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील असून बॅरेजची श्रृंखला निर्माण केली जाईल. पाटाच्या पाण्याद्वारे बंधन नलिकेद्वारेजिथे शक्य असेल तिथे विहिरीतून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. मात्र प्रत्येक शेताला जिल्ह्यामध्ये पाणी मिळावे यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातला सर्वाधिक पाणीदार जिल्हा म्हणून चंद्रपूर लवकरच नावलौकिकास येईलअसेही त्यांनी यावेळी आत्मविश्वासाने सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचले. या परिसरात दर्जेदार शिक्षण मिळावेयासाठी आपले प्रयत्न सुरू असून शून्य ते सहा वयोगटातील मुलांना आपला अधिकांश वेळा ज्या ठिकाणी काढावा लागतोअशा अंगणवाडी दर्जेदार करण्याकडे आपले लक्ष अधिक आहे. जिल्ह्यातील 403 अंगणवाड्या आयएससो करण्यात आलेल्या आहे. बल्लारपूर येथे नुकतेच मुलींच्या डीजीटल शाळेचे भूमिपूजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या चळवळीला जिल्ह्यामध्ये बळकट करण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुषमा स्वराज महिला उद्योग केंद्रांच्या माध्यमातून आर्थिक बळकटीकरण प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक गरिबाला कोणत्याही कार्डधारकाला दोन ते तीन रुपये दराने अन्नधान्य मिळेल व कोणत्याही जाती-जमातीचा भेदभाव न करता सर्वांना गॅस कनेक्शन मिळेलअसे त्यांनी स्पष्ट केले.           

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे ही कल्पना राबविली असून या परिसरातील प्रत्येक बेघर माणसाला वेगवेगळ्या योजनांमधून सबसिडी देत त्यांचे हक्काचे घर निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निराधारांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेसह वेगवेगळ्या योजनांमधील निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय आपण घेतला असून या मतदारसंघातील कोणत्याही गरिबाला रोजच्या जेवणाचीस्वतःच्या हक्काची घराची चिंता पुढील काळात राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. व्यासपीठावर ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरेराजेंद्र गांधीअरुण तिखेनिलेश खरबडेरामभाऊ महाडोळेविजय राऊतवासुदेव लोन बळे,संजय घाटे,समीर केने,वंदनाताई तिखेवर्षाताई लोणबळेशीतल गुरनुलेवासुदेव लोणबळे आदींची उपस्थिती होती.

     प्रास्ताविक संध्याताई गुरनुले यांनी केले तर यावेळी ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे रामभाऊ महाडोळे यांनी देखील संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण मोहुर्ले आणि आभार गुरुदास गुरनुले यांनी केले.