*
महावितरण चंद्रपुर परिमंडळात "वेबिनार" व्दारे ग्राहकांशी संवाद*
• *सुचना तसेच समस्या मा़ंडण्यासाठी* *ग्राहकांना सहभागी होण्याचे आवाहन*
चंद्रपुर ,दि. २५ मे २०२०,
दिनचर्या न्युज चंद्रपूर :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० नंतर सुरू झालेल्या संपूर्ण बंदच्या परिस्थितीत महावितरणच्या विविध वर्गवारितील सर्व ग्राहकांच्या वीज पुरवठ्याविषयी समस्या जाणून घेण्यासाठी महावितरण चंद्रपुर परिमंडळाच्यावतिने वेबिनारव्दारे ग्राहकांशी संवाद साधण्याचे आयोजन केले आहे. गुरुवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत होणाऱ्या या ' वेबिनार ' संवादात परिमंडळातील वीज ग्राहकांनी सहभागी होऊन आपल्या वीज विषयक समस्यांचे निराकरण करून घेण्याचे आवाहन चंद्रपुर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावमुळे सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने विविध तक्रार निवारण्यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी 'वेबिनार' किंवा व्हिडीवो कॉन्फरंन्सचे आयोजन करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री. ना. डॉ. नितिन राऊत यांनी दिले आहे. या आदेशाची नागपुर प्रादेशिक विभागात ताबडतोब अंमलबजाणी करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी यांनी दिल्यानंतर चंद्रपुर परिमंडळाच्यावतिने सोशल डिस्टंन्सिंग काटेकोरपणे पाळत ऑनलाईनच्या माध्यमातून या 'वेबिनार 'संवादाचे आयोजन केले आहे.
वेबिनार संवादात थेट ग्राहकांशी संवाद होणार असल्याने यावेळी ग्राहकांचा विजपुरवठा,विजबिल, वीज यंत्रणेची देखभाल दुरूस्ती आदीबाबत गाऱ्हाणी,प्रश्न ,अपेक्षा व अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच यावेळी महावितरणच्या विविध सेवांची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ग्राहकांनी मांडलेल्या तक्रारीचे तात्काळ निरसन करण्यासाठी मुख्य अभियंतासोबत चंद्रपुर व गडचिरोली जिल्हा कार्यालयाचे अधिक्षक अभियंता यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते ,सर्व उपविभागीय अभियंते या वेबिनार संवादात सहभागी होणार आहेत.
*'वेबिनार' संवादात असे सहभागी व्हावे:-*
' वेबिनार ' संवांद हा सर्व वीज ग्राहक ,ग्राहक प्रतिनिधी ,
पत्रकार अशा सर्वांसाठी असल्याने ज्यांना वीज समस्या किंवा सुचना मांडायच्या आहे त्या सर्वांना महावितरण चंद्रपुर परिमंडळाच्यावतीने गुरुवार दि २८ मे २०२० रोजी आयोजित या वेबिनारमधे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून
सहभागी होता येईल. ही लिंक आहे.
https://meet.google.com/wap-nvkp-xwz
ज्या ग्राहकांकडे
Google meet app डाऊनलोड केलेले नसेल त्यांनी सदर ऐप गुगल प्ले स्टोअरमधुन डाऊनलोड करुन सदर लिंकवर क्लिक करुन या 'वेबिनार' सवांदात सहभागी व्हावे असे चंद्रपुर परिमंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
*महावितरण चंद्रपुर परिमंडळ*
दिनचर्या न्युज