अखेर त्या फासे पारधी समाजाच्या लोकांना 'त्या' देवदूताने पोहचविले त्यांच्या स्वगावी




अखेर त्या फासे पारधी समाजाच्या लोकांना 'त्या' देवदूताने पोहचविले त्यांच्या स्वगावी

नागभीड प्रतीनीधी :दिनचर्या न्युज

चंद्रपूर :-
वैशाख पोर्णिमेच्या दुपारी चार वाजता एक बस गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळा ता. चामोर्शी येथून नागभीड तालुक्यातील चिंधीमाल येथील आपल्या पोटाचा चरितार्थ भागविण्यासाठी गेलेल्या परंतु कोरोना मुळे अडकुन पडलेल्या फासे पारधी समाजाच्या जवळ पास ३० ते ४० लोकांना नागभीड येथील शिवटेकडीच्या पायथ्याजवळील पडित अवस्थेत असलेल्या बसस्थानकावर सोडून बस निघून जाते... मात्र प्रशासनाला याची कुठलीही माहिती नसल्याने ते आपल्या रोजच्या कार्यात मग्न असताना या सगळ्या लोकांकडे लक्ष नाही वेधलं... मात्र बराच वेळ पासून आपल्या साहित्यासह आणि लहान मुला बाळासह ताटकळत उभे होते.. यात एका चार दिवसाच्या बाळाचा व त्याचा आईचा समावेश होता...
बौध्द पोर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात या सगळ्यांची ही घालमेल तिथुन घराकडे जात असलेल्या नागभीड येथील आपुलकी फाऊंडेशन संचालक मनोज कोहाट यांच्या लक्षात येताच त्यांनी तिथे जाऊन विचारपूस केली असता त्यांची व्यथा कळली.. लगेच या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली मात्र मदत न मिळल्याने त्यांनी लागलीच अश्या लोकांसाठी कोरोना काळात देवदूत ठरलेल्या जि.प.सदस्य व भाजपाचे चंद्रपुर जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांना फोन लावला व सदर परिस्थिती सांगितली... तातडीने संजयजी गजपुरे त्या ठिकाणी पोचले व ट्रॅक्टर ची व्यवस्था करून त्यांच्या सर्व मुला बाळांसहित व सामानासह गावी रवाना केले..!!
कुठलाही मोबाइल किंवा स्थानिक संपर्क नसलेल्या या फासे पारधी समाजाच्या या अनेक तासापासून ताटकळत असलेल्या या लोकांना सुखरूप गावी पाठवलं...नंतर आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या माध्यमातून गरजू लोकांसाठी सुरू असलेल्या भोजनदानाच्या माध्यमातून त्यांच्या राहते गावी रात्री १०.०० वाजता चिंधीमाल येथील पारधी टोलीवरील जि.प.शाळेत स्वत: संजय गजपुरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत जेवण पोहचविले व सर्वांचे जेवण झाल्यावरच घरी परतले....
यावेळी पारधी टोलीवरील उपस्थित पोलिस पाटील, ग्रा.पं.सदस्य , आशा वर्कर, आंगणवाडी सेविका यांचेसह सर्वांनीच नेहमीच संकटसमयी धावुन येणाऱ्या या देवदुताचे आभार मानले.

यावेळी मनोज कोहाट,सचिन चिलबुले,नरेश राखडे,विनोद गिरडकर,पराग भानारकर यांची उपस्थिती होती.


▪दिनचर्या न्युज