अखेर वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या, भद्रावती पोलीसांची कारवाई

वाळू तस्करीत कृउबास सभापती सह चौघांना अटक* *भद्रावती पोलिसांची कारवाई

अखेर वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या, भद्रावती पोलीसांची कारवाई


आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी



दिनचर्या न्युज :-भद्रावती :-

शहरातील रेती व्यवसायिक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे यांच्यासह अन्य तीन जणांना भद्रावती पोलिसांनी अवैध रेती तस्करी प्रकरणात अटक केली असून त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरातील रेतीक्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून भद्रावती तालुक्यात अवैध रेती प्रकरण चांगलेच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील एमआयडिसी, तेलवासा परिसरात तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी यांनी २२५ ब्रास तर वेकोलीच्या नवीन कुनाडा खदान परिसरात १५० अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला होता. हा अवैध रेती साठा नेमका कुणाचा यासाठी याचा तपास भद्रावती पोलिसांकडे देण्यात आला होता तेव्हापासून हा रीती साठी करणाऱ्या व्यवसायिकांची चौकशी सुरू होती. पोलीस तपासात हे सर्व अवैध रेतीसाठी वासुदेव ठाकरे यांनी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाळू व्यवसायिक वासुदेव ठाकरे, संतोष चिकराम, किरण साहू व अनिल केडाम यांना अटक करण्यात आली. या कारवाईत दोन हायवा ट्रकही जप्त करण्यात आले. ही कारवाई ठाणेदार सुनील पवार यांच्या मार्गदर्शनात मस्के यांनी केली.

दिनचर्या न्युज