संचारबंदीतही जिल्हाबंदी असताना शुध्दा दारुचा मोठा साठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी करवाई!

संचारबंदीतही जिल्हाबंदी असताना शुध्दा दारुचा मोठा साठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी करवाई!

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!
घुग्गूस टोल नाक्यावर पकडला 27 लाखांचा दारू साठा !
चंद्रपूर :दिनचर्या न्युज :-
घुग्गूस टोलनाक्यावर शुक्रवार दि. 12 जुन रोजी स्थानिक गुन्हे शाखेने ओम प्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात मोठी कारवाई केली. 270 पेट्या देशी दारू भरून येणारी मेटॅडोर क्र. mh-40-bg-3279 गाडी घुगुस टोलनाक्यावर पकडली. आरोपी कुणाल रामदास वेलतुरवार याला यावेळी मुद्देमालासह रंगेहाथ अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे बोबडे यांच्या नेतृत्वात पीएसआय विकास मुंढे, पद्माकर भोयर, संदीप वर्हाडे, अमोल धंदरे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली. महत्त्वाचे म्हणजे मुख्य आरोपी असलेला इलियास हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घुग्घूस पोलिस करीत आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून संचारबंदी असतांना ही दोन टोल नाके पार करून हा दारू साठा चंद्रपूरात येत होता, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारवर ही कारवाई केली. संचार बंदीनंतर सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. संचारबंदी नंतर जिल्हातंतर्गत प्रवास करता येत असून जिल्ह्यातून बाहेर जाण्यास मनाई असल्यानंतर ही एवढा मोठा दारू साठा जिल्ह्यात कसा येत आहे, हा संशोधनाचा विषय असून बसलेला इलियास वर आता काय करता येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.