जीवनदायी आरोग्य कार्ड ठरणार वरदान, जिप सदस्य पाझारे यांचा पुढाकार
जीवनदायी आरोग्य कार्ड ठरणार वरदान,

जिप सदस्य पाझारे यांचा पुढाकार


*जीवनदायी फाउंडेशनचा उपक्रम*

दिनचर्या न्युज :-

"आपका स्वास्थ हमारा लक्ष" हे ब्रीदवाक्य घेऊन जीवनदायी फाउंडेशन काम करीत आहे. फाउंडेशनचा हा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमातून ज्या नागरिकांना आरोग्य कार्ड दिले जात आहेत त्यांना उपचार करताना येणाऱ्या खर्चात मोठी सूट दिली जाणार आहे. त्यामुळे हे आरोग्य कार्ड रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी केले ते बिरसा मुंडा सभागृह नकोडा येथे जीवनदायी फाउंडेशनच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिरात बुधवार (२सप्टेंबर)ला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी नकोडा येथील सरपंच तनुश्री बांदूरकर, पंचायत समिती सदस्य सविता कोवे, ऋषी कोवे, किरण बांदूरकर, मंगेश राजगडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पाझारे म्हणाले, नकोडा येथील ग्राम वासियांना चांगल्यात चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आपण प्रयत्नशील आहोत त्याचाच परिपाक म्हणून आज आरोग्य कार्ड बनविण्याचे शिबिर आयोजित केले, यासोबतच चंद्रपुरातील विविध नामांकित दवाखान्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दवाखान्यात गेल्यानंतर रुग्णांना मोठी सूट दिली जाणार आहे नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.ही सुविधा त्यांना यवतमाळ जिल्ह्यातही मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले*
यावेळी सरपंच तनुश्री बांदूरकर प्रस्तविकात म्हणाल्या ,जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांच्या नेतृत्वात नकोडा ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक विकासाची कामे झाली जनतेच्या समस्या समजून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे कार्य नेहमीच ब्रिज भूषण भाऊ करीत आले आहे आज येथील नागरिकांना जे आरोग्य कार्ड दिले जात आहे त्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला असे त्या म्हणाल्या कोणाच्या काळात भूषण भाऊंनी जनतेला केलेली मदत सर्वांच्या कक्षात आहे या आरोग्य कार्डमुळे गोर गरीब व गरजू जनतेला सर्वाधिक लाभ होईल असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे संचालन व आभार मंगेश राजगडकर यांनी केले.या शिबिरात ३५० नागरिकांनी नोंदणी केली,यात मातृशक्तीचा विशेषत्वाने सहभाग होता.


दिनचर्या न्युज