जिल्ह्यात 24 तासात 173 बाधित ; दोन बाधितांचा मृत्यू,बाधितांची एकूण संख्या 13400 वरचंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 10276 बाधित कोरोनामुक्त

बाधितांची एकूण संख्या 13400

उपचार सुरु असणारे बाधित 2925

जिल्ह्यात 24 तासात 173 बाधित ; दोन बाधितांचा मृत्यू

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि.18 ऑक्टोंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 173 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 13 हजार 400 वर पोहोचली आहे. 10 हजार 276 बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 925 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, मुंगोली, वणी यवतमाळ येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 10 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, दुसरा मृत्यू शिवाजी चौक परीसर, पोंभुर्णा येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 16 ऑक्टोबरला डॉ.पंत हॉस्पीटल,चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. दोनही बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार होता. पहिल्या बाधिताचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर तर दुसऱ्या बाधिताचा डॉ.पंत हॉस्पीटल, चंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 199 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 188, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 56, बल्लारपुर तालुक्यातील पाच, पोंभूर्णा तालुक्यातील तीन, चिमूर तालुक्यातील चार, मुल तालुक्यातील 11, ब्रह्मपुरी तालुक्यातील 17, नागभीड तालुक्‍यातील 12, वरोरा तालुक्यातील पाच, भद्रावती तालुक्यातील 13, सिंदेवाही तालुक्यातील 21, राजुरा तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील चार, कोरपना तालुक्यातील 15, गडचिरोली व यवतमाळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 173 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील बिनबा वार्ड, सिविल लाइन, घुग्घुस, स्नेह नगर, ऊर्जानगर, तुकुम, नगिनाबाग, घुटकाळा वार्ड, बालाजी वार्ड, लालपेठ कॉलरी, दाद महल वार्ड, आकाशवाणी रोड परिसर, जीएमसी परिसर, महाकाली वार्ड, इंदिरानगर, बाबुपेठ, केरला कॉलनी परिसर, रामनगर, भिवापुर वॉर्ड, विवेक नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्ड, राणी लक्ष्मीबाई वार्ड, विसापूर परिसरातून बाधित ठरले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा, शिवाजी चौक, बोर्डा झुल्लुरवार भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवनी, नवरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापुर, करंजी, नवीन बस स्टँड परिसरातून बाधित ठरले आहे. राजुरा तालुक्यातील विहिरगांव, वार्ड नंबर 4 परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर चार, वार्ड नंबर 16, चिरोली, मारोडा, गडीसुर्ला, नांदगाव भागातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर, सुरक्षा नगर, सुमठाणा परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील तळोदी, पार्डी, नवीन बस स्टॅन्ड परिसर, सुलेझरी वार्ड नंबर 8 परीसर, कोजाबी माल, बाळापुर, सावरगाव, पळसगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील एमएसईबी कॉलनी परिसर, चैतन्य नगर बोर्डा परिसरातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, उपरवाही परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधीनगर, बाळापुर पेठ वार्ड, टिळक नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

दिनचर्या न्युज