वायगाव-दुधाळा गावातील व्यसनमुक्त युवकांचा पोलीसांकडून सत्कार

वायगाव-दुधाळा गावातील व्यसनमुक्त युवकांचा
पोलीसांकडून सत्कार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
येणारी नवीन पिढी ही विविध व्यसनाच्या आहारी जात आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातीलही युवा पिढी व्यसनाधीन झाली आहे. मात्र ग्रामपंचायत वायगाव-दुधाळा येथील विस युवकांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला आहे.
यासाठी वायगाव-दुधाळा येथे व्यसनमुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनगर पोलीस ठाण्याचे एपीआय चव्हाण होते.पोलीस पाटील विठ्ठल काळे,
सरपंच उमाजी सुरतीकर, राठोड साहेब, आत्राम साहेब, मडावी साहेब, यांच्या उपस्थितीत व्यसन मुक्त होण्यासाठी संकल्प करणारे किशोर काळे, रूपेश कुळमेथे, प्रकाश कोहचाळे, राजू मडावी, विनोद सोयाम, विशाल तोडासे, किशोर मडावी, अशा एकंदरीत जवळपास विस युवकांनी व्यसनमुक्त होण्या-याचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील नागरिकांची उपस्थिती होती.