धनराज मुंगले यांचा कांग्रेस मध्ये प्रवेश, पक्ष तारेल का?





धनराज मुंगले यांचा कांग्रेस मध्ये प्रवेश, पक्ष तारेल का?

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चिमूर विधानसभा क्षेत्रात कार्यरत असलेले व्यवसायिक, उधोजग, पुर्वी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष असलेले धनराज मुंगले हे मागील काही वर्षांपासून पक्षाच्या कटकारस्थाने नाराज होते. त्याना विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने टिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला.आणी त्यांनी निवडणूक लढविली. मात्र त्यांच्या पदरात अपयश आले. जेवढा वाजा-गाजा केला त्यापेक्षा कमी मतांनी नामुष्की पत्करावी लागली. आता कांग्रेस पार्टीचा झेंडा आपल्या गळ्यात बांधून घेतला तो पक्षाला तारेल का? असा प्रश्न चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
अनेक दिवसापासून जिल्ह्यात चर्चेचा सुरू होती की धनराज मुंगले कांग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. अखेर त्यांनी मुंबई येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा श्री नानाभाऊ पटोले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी मा. श्री विजयभाऊ वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री तसेच मा श्री प्रकाशभाऊ देवतळे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थित कार्यकर्ते मा श्री यशवंतजी वाघे माजी सरपंच नेरी, मा श्री विठ्ठल पाटील कोरेकर खडसंगी, मा श्री नानाभाऊ नंदनवार शिवसेना शहर प्रमुख, मा श्री अनंताजी येळणे शंकरपुर, मा श्री प्रदीपजी तळवेकर चिमूर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

दिनचर्या न्युज