चेक आंबेधानोरा येथील शेत शिवारातील मुख्य पांदण रस्ते व नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्याची मागणी!
चेक आंबेधानोरा गाव येथील शेत शिवारातील मुख्य पांदण रस्ते व नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्याची मागणी!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
राहुल प्रियंका गांधी सेना ( काँग्रेस ) चे राष्टीय अध्यक्ष श्री मा. जगदीश जी शर्मा सर यांच्या आदेशानुसार गोरगरीब जनतेला मदत करण्याचे कार्य सुरु आहेत. या माध्यमातून श्री. मा. विजयभाऊ वड्डेटीवार ( पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा ) व खासदार श्री. मा. बाळूभाऊ धानोरकर यांना पोंभूर्णा तालुक्यातील चेक आंबेधानोरा गाव येथील शेतशिवारात येणार जाणारा मुख्य पांदण रस्ता व नाल्यावरती पुलाचे बांधकाम  करण्याकरता   श्री. सुर्या अडबाले  ( राहुल प्रियंका  गांधी सेना ( काँग्रेस ) युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) यांनी व  त्या गावच्या सरपंच व  गावकर्यांच्या   माध्यमातून   विंनती करण्यात आली. 
पोंभूर्णा तालुक्यातील  चेक  आंबेधानोरा. बोरगाव ( रीठ ) उमरी ( तुकूम ) सातारा ( कोमटी ) सातारा ( भोसले ) आंबेधानोरा  ( रीठ ) या चार पाच गावातील  गावकर्यांची  900 एकर  शेती आहेत त्या शेतशिवारात जाण्याचा मुख्य रस्ता व नाला  येतात  पण  रस्ता  खूप खराब असून व बाराही महिने त्या नाल्याला पाणी साचून असते व  शेतशिवारात शेतकऱ्याना ये जा करायला खूप जीवाचा आटापिटा करावा लागतो.  कारण नाल्याला पाणी साचून असल्या मुले जीव धोक्यात टाकून त्या वरती खांब  किव्हा मोठी बल्लि टाकून  ये जा कराव लागते. मनून  त्या गावच्या प्रथम नागरिक  सरपंच  सौ. निरंजना ताई मडावी व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी राहुल प्रियंका गांधी सेना  ( काँग्रेस )  श्री सुर्या अडबाले  ( युवक अध्यक्ष महाराष्ट्र  राज्य ) यांना  सदर गावकर्यांची होणाऱ्या  त्रासाची माहिती दिली व सुर्या  अडबाले हे  स्वतः स्पॉट  वरती जाऊन पाहणी केली. व खरोखरच ग्रामपंचायतीने व गावकऱ्यांनी  केलेली  तक्रार हि  खूप भयानक असून   शेतशिवारात  ये जा करण्याऱ्या  शेतकऱ्यांना होणार  त्रास  बघितला व  चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री   श्री. विजयभाऊ वड्डेटीवार व खासदार श्री. बाळूभाऊ धानोरकर यांना  पांदण  रस्त्याचे व नाल्यावरती पुलाचे बांधकाम  लवकरात लवकर       करून द्यावं हि विंनती  गावातील नागरिकांकडून करण्यात आली. 

दिनचर्या न्युज