27 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ "भारत बंद" यशस्वी करा ! राष्ट्रवादी काँग्रेस भारत बंदला पाठिंबा !

27 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ "भारत बंद" यशस्वी करा ! राष्ट्रवादी काँग्रेस भारत बंदला पाठिंबा !


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकरी आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत, केंद्रातील मुजोर मोदी सरकार उद्योगपतींच्या दबावाखाली या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे,केंद्र सरकारच्या निषेधार्थ सोमवार 27 सप्टे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ होणाऱ्या "भारत बंद" मध्ये जिल्ह्यातील "राष्ट्रवादी काँग्रेसच्या" कार्यकर्त्यांनी आपआपल्या तालुक्यात सहभागी होवून बंद यशस्वी करावा अश्या सूचना आज चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य यांनी दिल्या,बैठकीला महिला जिल्हाध्यक्षा सौ बेबीताई उईके,ओबसी सेलचे प्रदेश सरचिटणीस श्री.डि.के.आरिकर,सामाजिक न्यायचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.सुनील दहेगावकर,चंद्रपूर शहर महिला अध्यक्ष सौ.ज्योतिताई रंगारी,युवक शहर अध्यक्ष श्री.प्रदीप रत्नपारखी,ओबसी सेलचे शहर अध्यक्ष श्री.माणिक लोणकर,श्री.एकनाथ कन्नाके,डॉ.देव कन्नाके,दिनेश एकवनकर सतीश मांडवकर,उपस्थित होते.

दिनचर्या न्युज