मनपातील सभापतीपदाचे वादळ, बळग्यानतंर तरी थांबेल का?


मनपातील सभापतीपदाचे वादळ, बळग्यानतंर तरी थांबेल का?

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-

चंद्रपूर महानगर पालिकेत सभापती पदावरून रंगलेला वाद आता भाजप गटनेते पद बदलाविण्यासाठीचा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संदर्भात नागपूर वारी झाली.
भाजप पक्षाचे गटनेते वसंत देशमुख हे सुध्दा नागपूर वारी करून आल्याची माध्‍यमातुन चर्चा सुरू आहे. म्हणजेच काय तर जोवर भाजप आपला गटनेता बदलणार नाही तोवर चंद्रपूर महानगर पालिकेची स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक भाजप होऊ देणार नाही. म्हणून मनपातील वादळ, बळग्यानतंर तरी थांबेल का?
असा प्रश्न आता चंद्रपूरची जनता विचारत आहे.
यात महानगर पालिका आयुक्त प्रशासकीय अधिकारी आहेत की, सत्तारूढ पक्षाचे सदस्य असल्यागत आपल्या अधिकाराला डावलत असल्याचे चित्र आहे. परंतू भाजप आणी आयुक्त यांच्या संगनमतामुळे इतर पक्षाचे सदस्य जे स्थायी समिती सदस्य म्हणून जायला पाहिजे त्यांच्यावर अन्याय होत आहे. तसेच महानगर पालिकेचा कारभार विना स्थायी समिती सभापती शिवाय चालणार आहे?
    याला सत्तेची मुजोरी नाही तर काय म्हणायला हवे कारण नियमानुसार 31 मार्चला विद्यमान  सभापती पदाचा कार्यकाळ संपणार होता. तेव्हा मनपा प्रशासनाने 31 मार्चला होणाऱ्या आमसभेत हा विषय घेऊन नविन सदस्यांची प्रक्रिया राबवायला हवी होती. आणी असा ठराव जानेवारी 2021 मध्ये स्थायी समितीच्या बैठकीत झालेला होता. असे असताना हेतुपुरस्सर हा विषय आमसभेत न घेता सरसकट दाबल्या गेला कारण मागील सभापती पदावरून वसंत देशमुख यांना  अकस्मात डावलून रवि आसवांनी यांना सभापती बदलाविण्यात आले होते. तेव्हा भाजप वर्तुळात सहा सहा महिने कार्यकाळ ठरला त्यामुळे रवि आसवांनी यांना सहा महिने कार्यकाळ भेटायला हवा म्हणून हा खटाटोप झाला असे दिसते. परंतु असा कुठला महानगर पालिका अधिनियम आहे असे आयुक्त यांना विचारले असता आयुक्त महापौर यांचे विशेष अधिकाराचा दाखला देतात तर महापौर आयुक्त यांच्या कडे बोट दाखवत होते. त्यातल्या त्यात कोरोना महामारीमुळे सर्व सभा बैठकी निवडणुका यावर तूर्तास स्थगिती दिल्याने रवि आसवांनी यांना शासन निर्णय 28 जुलै पर्यंत सभापती पद भोगण्याची संधी मिळाली. परंतू त्यानंतर आयुक्त यांनी निवडणुका घेणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता त्यांनी विपरीत इतिहास घडविला.
      झाले असे की, स्थायी समिती तथा महिला व बालकल्याण सभापती निवडणुक थांबवून केवळ प्रभाग समितीच्या निवडणुका घेतल्या. जे की चंद्रपूरच्या इतिहासात ऐतिहासिक परंपरा तोडण्याचे कार्य बघायला मिळाले. आता ही परंपरा इथपर्यंत मजल मारत आहे की,! "जोवर सत्तारूढ पक्ष आदेश देत नाही व त्यांच्या मनासारखे घडत नाही तोवर स्थायी समिती व महिला व बालकल्याण समिती महापौर आपल्याच हातात ठेऊन इतर नव्याने निवडून जाणाऱ्या सदस्याची वाटेल तशी गळचेपी करु शकते" असे मनने वावगं ठरू नये! 
      खरं तर हा सगळा खटाटोप फक्त वसंत देशमुख यांना सभापती न बनू देण्यासाठी चालला आहे. मग असा प्रश्न येतो की, वसंत देशमुख सभापती झाले तर काय होईल? याचा अर्थ असा की, वसंत देशमुख हे प्रामाणिक नेते असल्याने कुठेतरी महानगर पालिकेत चाललेल्या व्यावसायिकरणा वर अंकुश लागू शकते तथा काही तरी घोड बंगाल असावे ज्यामुळे सत्ताधारी पदावर विराजमान असणाऱ्या पदाधिकारी लोकांना धोका वाटत असावे. म्हणून हे सरसकट कटकारस्थान चाललेले दिसते. अशी सर्वत्र चर्चा आहे.
    आता ही चर्चा याहीपलिकडे जाऊन अशी बोलते की, ज्या पद्धतीने भाजप पक्ष श्रेष्ठीने वसंत देशमुख यांचे गटनेते पद जावे म्हणून श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात सर्व नगरसेवकाची बैठक घेतली व त्यात जे कारण सांगितले  की,"वसंत देशमुख हे काँग्रेसचे दोन नाव स्थायी समिती सदस्य म्हणून घेणार असल्याने त्यांचे गटनेते पद काढून घेणे गरजेचे आहे. म्हणून तुम्हीं सर्व स्वाक्षरी करा असे आदेश देऊन 34 सदस्याची सही घेतली. परंतु मुळ मुद्दा असा की, वसंत देशमुख हे तर भाजप आणी मित्र पक्षाचे गटनेते आहेत मग ते विरोधी पक्षाचे सदस्य कसे बरे घेऊ शकतात ?
 हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला समजते. मग पक्ष श्रेष्ठी असे आपल्याच नगरसेवक लोकांना का बर खोटं बोलत असेल? तर निश्चित खुप मोठा घोड बंगाल आहे.हे सर्व सामान्य माणसाच्या समजण्या पलीकडे आहे. 
किंवा पक्ष श्रेष्ठी सुध्दा सामील तर नसावे ना म्हणून प्रश्न येणे स्वाभाविक आहे.
       आता प्रश्न असा आहे की, पक्ष श्रेष्ठीच्या दबावाखाली नगरसेवकांनी स्वाक्षरी केल्या तर खऱ्या पण नियमानुसार गटनेते पद बदलण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर यांच्या समक्ष संख्याबळ दाखवून व ओळख परेड करुनच वसंत देशमुख यांचे गटनेते पद रिक्त केल्या जाऊ शकते. मग पक्ष श्रेष्ठी ज्याप्रमाणे व्यक्तिगत रित्या नगरसेवकाच्या स्वाक्षरी घेण्यासाठी आपल्या पदाची गरिमा विसरले अगदी त्याच स्वरूपात परत ते सर्व नगरसेवकांना स्वतःच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तांकडे घेऊन जाणार का? हा मोठा प्रश्न उभा होतो.
        जर असे होत असेल तर निश्चित वसंत देशमुख जो की एक सर्वसाधारण नगरसेवक होते ते आहेत. मग सर्व काही आलबेल होत असताना 
 पक्षाकडे संख्या बळ असताना ऐवढा खटाटोप, धुडगूस कशासाठी? हे मात्र चंद्रपुरातील जनतेला सांगण्याची गरज नाही! 
  म्हणून म्हणावे लागेल की,
हे वसंता तु कमळ फुलविला खरा
पण अटल विचाराला नाही उरला थारा
म्हणून जो काही चालला षडयंत्र पसारा
त्यात, काय कोणाची चुक?